
Senior Citizen Saving Scheme | एसबीआयची सिनिअर सिटीजन सेविंग स्कीम रिटायरमेंट झाल्यानंतर योग्य ठिकाणी पैसे गुंतवून चांगले व्याजदर मिळण्यासाठी आणि गुंतवणूक करू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला सुरक्षा मिळते सोबतच लोन मिळण्याची पुरेपूर गॅरंटी असते. रिटायरमेंट नंतर आपलं आयुष्य सुखात जावं असं प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला वाटतं.
यासाठी तुम्ही एसबीआयच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये पैसे गुंतवून स्वतःची चांगलीच मदत करू शकता. ही स्कीम नागरिकांना 8.2%ने व्याजदर प्रदान करत आहे. त्यामुळे जास्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया योजनेबद्दल सर्व काही.
या स्किमसाठी कोण कोण आहे पात्र :
पोस्टाची सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही एसबीआय अंतर्गत राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही एसबीआय बँकेत किंवा जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन योजनेसाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर 60 किंवा त्याहून अधिक वय वर्ष असलेले ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. परंतु एखादा नागरिक 60 वर्ष होण्याआधीच रिटायर झाला असेल तर, तो देखील या योजनेसाठी पात्र ठरू शकतो. म्हणजेच 50 वयवर्ष असलेले नागरिक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. परंतु हा नियम हिंदू अविभाजित कुटुंब आणि एनआरआय यांना लागू होत नाही.
1000 रुपये गुंतवून योजना सुरू करा :
पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये तुम्ही 30 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर गुंतवणुकीची कमीत कमी रक्कम 1000 रुपयांपर्यंत दिली गेली आहे. तुम्ही हजार रुपयांखाली गुंतवणूक करू शकत नाही. हे सर्व नियम 1.04.2023 पासून सुरू झाले आहेत.
कंपाउंड व्याजाचा अनोखा फायदा :
या योजनेमध्ये तुम्हाला कंपाउंड व्याज म्हणजे तो व्याजावर आणखीन व्याज दिले जाते. ज्यामुळे तुमचा डबल फायदा होऊन चांगली रक्कम जमा होण्यास मदत होते. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार 1.04.2023 वर्षापासून एसबीआयच्या या स्किमवर दरवर्षाला 8.20% व्याजदर मिळते.
प्री-मॅच्युअर सुविधा :
एसबीआयची ही स्कीम प्री-मॅच्युअर सुविधा देखील देते. सीनियर सिटीजन सेविंग स्किम 5 वर्षांची असली तरीही तुम्ही 3 वर्षापर्यंत वाढवू शकता. त्याचबरोबर हा कार्यकाळ तूम्ही 8 वर्षांचा देखील करू शकता. त्याचबरोबर तुम्ही प्री-मॅच्युअर सुविधेनुसार वेळेआधीच पैसे काढू शकता परंतु याचे तुमच्याकडून पैसे आकारण्यात येतील.