
Senior Citizen Saving Scheme | बँकांच्या मुदत ठेवी (एफडी) हा ठराविक काळातील मुदत उत्पन्नाचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. यामध्ये ठेवीच्या वेळी व्याजदर आणि मॅच्युरिटी निश्चित केली जाते. ज्या गुंतवणूकदारांना बाजाराची जोखीम परवडत नाही, त्यांच्यासाठी बँक एफडी हा मोठा पैसा कमावण्याचा एक चांगला मार्ग आहे.
स्मॉल फायनान्स बँका सहसा एफडीवर जास्त सुरक्षित ऑफर देतात. येथे आम्ही टॉप- 5 व्याज देणाऱ्या बँकांना घेतले आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक नियमित ग्राहकांना एफडीवर 9.1 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.25 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर 5 वर्षांच्या एफडीवर लागू आहेत.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक नियमित ग्राहकांना 9 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. दोन कोटीरुपयांपेक्षा कमी ठेवींवर 1001 दिवसांच्या एफडीवर हे व्याजदर लागू आहेत.
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक नियमित ग्राहकांना एफडीवर 8.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.25 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. दोन कोटीरुपयांपेक्षा कमी ठेवींवर 12 ते 18 महिन्यांच्या एफडीवर हे व्याजदर लागू आहेत.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
इक्विटोस स्मॉल फायनान्स बँक नियमित ग्राहकांना एफडीवर 8.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.77 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. दोन कोटीरुपयांपेक्षा कमी ठेवींवर 444 दिवसांच्या एफडीवर हे व्याजदर लागू आहेत.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक नियमित ग्राहकांना एफडीवर 8.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.10 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर 2 वर्षे ते 3 वर्षांच्या एफडीवर लागू आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.