
SERA Investment Share Price | ‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स अँड फायनान्स’ कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स एक्स स्प्लिटवर ट्रेड करत आहेत. या कंपनीने आपले शेअर्स 1 : 5 या प्रमाणात विभाजित करण्याची घोषणा केली आहे. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 82.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीने भांडवली बाजारात आपल्या शेअरची तरलता वाढवण्यासाठी आणि किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्सची अधिक परवडणारी बनवण्यासाठी स्टॉकचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या स्टॉक स्प्लिटसाठी 28 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला होता.
स्टॉक स्प्लिट व्यतिरिक्त सेरा इन्व्हेस्टमेंट्स अँड फायनान्स कंपनीने आपल्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनच्या कॅपिटल क्लॉजमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सेरा इन्व्हेस्टमेंट्स कंपनीने Cera Invest Advisory Private Limited नावाची नवीन उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीच्या शेअरची कामगिरी :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सेरा इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीचे शेअर 2.26 टक्के वाढीसह 431.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर नफा मिळवून दिला आहे. एका वर्षात शेअरची किंमत 510 टक्के मजबूत झाली आहे. ही कंपनी मुख्यतः कमर्शियल सेवा प्रदान करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.
कंपनी प्रामुख्याने नॉन बँकिंग वित्त सेवा क्षेत्रात सेवा प्रदान करण्याचे काम करते. प्रामुख्याने कंपनी गुंतवणूक क्रियाकलाप आणि वित्त पुरवठा व्यवसायात गुंतलेली आहे. NBFC म्हणून नोंदणीकृत असलेली ही कंपनी आघाडीची गुंतवणूक कंपनी मानली जाते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.