 
						Servotech Power Systems Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स या सोलर आणि ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्ससह वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या कंपनीचे शरसा गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 93.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
सर्वोटेक पॉवर सिस्टम्स स्टॉक स्प्लिट
आता कंपनीने शेअर्स दोन तुकड्यात विभाजित करण्याची घोषणा केली आहे. स्टॉक स्प्लिटची बातमी आल्यानंतर सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळत आहे.
सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीने सेबीला कळवले
सेबीला दिलेल्या माहितीत सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीने कळवले आहे की, कंपनीने 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचे 2 तुकड्यात विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 1 रुपयेवर येईल. मार्च 2023 तिमाहीत सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीने 6.05 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर एक वर्षभरापूर्वी याच तिमाहीत सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीने 1.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
सर्वोटेक पॉवर सिस्टम्स शेअरने 1658 टक्के परतावा
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 80.82 रुपये किमतीवर ओपन झाले होते. 5 वर्षांपूर्वी सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 5.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच या कालावधीत कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 1658.93 टक्के परतावा कमावला आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट म्हणजे सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअरमध्ये 173 टक्के वाढ झाली आहे. या कंपनीचे बाजार भांदा 942 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		