 
						Shakti Pumps Share Price | शक्ती पंप्स कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.76 टक्क्यांच्या वाढीसह 1523.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शक्ती पंप्स कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. म्हणजेच मागील 2 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी शक्ती पंप्स कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के वाढीसह 1,476.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील 6 महिन्यांत शक्ती पंप्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः दुप्पट केले आहेत. तर मागील एका महिन्यात शक्ती पंप्स कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 44 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील 6 महिन्यांत शक्ती पंप्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 106 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात शक्ती पंप्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 244 टक्के वाढवले आहेत.
नुकताच या कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीने 29 जानेवारी 2024 रोजी मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळ लिमिटेडकडून 46 एकर जमीन ताब्यात घेतली आहे. या कंपनीला ही जमीन A-10 आणि B-86 स्मार्ट इंडस्ट्रियल टाउनशिप, सेक्टर-7, पीतमपूर इंदोर शहरात मिळाली आहे. या जमिनीचा वापर कंपनी भविष्यातील व्यवसाय विस्तारासाठी करणार आहे.
27 जानेवारी रोजी कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले होते. डिसेंबर तिमाहीत कंपनीने तब्बल 495.60 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 57 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या तिमाहीत कंपनीचा EBITDA 71 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर PAT 45.2 कोटी रुपयेवर आला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		