
Shakti Pumps Share Price | शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शक्ती पंप्स इंडिया कंपनीचे शेअर्स 17 टक्क्यांच्या वाढीसह 835.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ही तेजी एका सकारात्मक बातमीमुले पाहायला मिळत आहे.
शक्ती पंप्स इंडिया कंपनीने सेबी दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनी शक्ती पंप्स इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली आहे. आज गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी शक्ती पंप्स इंडिया कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के वाढीसह 873.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ऑर्डर तपशील
शक्ती पंप्स इंडिया कंपनीने ऑर्डर मिळाल्याची बातमी जाहीर करताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीला हरियाणा राज्य सरकारने 358 कोटी रुपये मूल्याचे एक कॉन्ट्रॅक्ट दिले आहे.
पंप निर्माता शक्ती पंप्स कंपनीला बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हरियाणा राज्य अक्षय ऊर्जा विभागाकडून 778 पंपांचा पुरवठा करण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. याचे एकूण मूल्य 358 कोटी रुपये असेल. शक्ती पंप्स इंडिया कंपनीला हरियाणा राज्य सरकारने कुसुम-3 योजने अंतर्गत ही वर्क ऑर्डर जारी केली आहे.
PM-KUSUM योजना तपशील
2019 साली प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा योजना म्हणजेच PM-KUSUM योजने अंतर्गत खाजगी कंपनी मार्फत पडीक जमिनीवर 10,000 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित ग्रीड कनेक्टेड अक्षय ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यासाठी लाँच करण्यात आले होते. या योजने अंतर्गत 500 KW ते 2 MW क्षमतेचे अक्षय ऊर्जा प्रकल्प शेतकरी, सहकारी संस्था, पंचायतीच्या मदतीने लोक कल्याणासाठी उभारले जाणार आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.