22 September 2023 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अक्षय ऊर्जा क्षेत्रातील वाढ फायद्याची ठरणार? स्टॉक टार्गेट प्राईस किती असेल? Brightcom Share Price | मागील 5 वर्षांत 1200% परतावा देणाऱ्या ब्राइटकॉम गृप शेअरमधील हालचालींनंतर नेमकं काय करावं? काय स्थिती? iPhone 15 | मोदींच्या नव्या भारतात iPhone 15 अमेरिका-दुबई पेक्षा महाग, किंमती पाहून म्हणाल 'हे कसलं मेक इन इंडिया'? Nykaa Share Price | भारत आणि कॅनडा वादाचा फटका नायका शेअर्सला, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? पुढे काय होणार? Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने नवीन सुविधा सुरु केली, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला महत्वाचा सल्ला, किती फायदा होईल? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नेमकं कारण काय? Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या
x

Shekhawati Poly Yarn Share Price | 65 पैशाचा पेनी शेअर, 1 महिन्यात 30 टक्के परतावा, स्टॉक विकत घ्यावा का?

Shekhawati Poly Yarn Share Price

Shekhawati Poly Yarn Share Price | मागील बऱ्याच महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात सेन्सेक्स इंडेक्स 2.33 टक्के कमजोर झाला आहे. त्याच वेळी काही पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहेत. यापैकी एक स्टॉक म्हणजे, ‘शेखावती पॉली यार्न लिमिटेड’. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने लोकांना 8.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात हा स्टॉक 30.00 टक्के वाढला आहे. बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Shekhawati Poly Yarn Limited)

शेअरची कामगिरी :
‘शेखावटी पॉली यार्न’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1.05 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 0.45 पैसे होती. 20 फेब्रुवारी 2023 ते 13 मार्च 2023 पर्यंत हा स्टॉक 50 पैशांवर ट्रेड करत होता. 13 मार्च 2023 नंतर शेअरची किंमत 30 टक्क्यांनी वाढली आणि तो 65 पैशांवर पोहोचला. या पेनी स्टॉकने मागील 6 महिन्यांत 23.53 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. त्याच वेळी मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे 23 टक्क्यांहून अधिक नुकसान केले आहे.

पेनी स्टॉक्स धोकादायक :
भारतीय शेअर बाजारात 10 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या शेअर्सना ‘पेनी स्टॉक’ म्हणतात. पेनी स्टॉकवर पैसे लावणे खूप धोकादायक असते. तथापि पेनी स्टॉक अचानक उच्च परतावा कमावून देऊ शकतात. मात्र अशा शेअर्सची तरलता खूप कमी असते. कोणत्याही पेनी स्टॉकमध्ये माहिती नसताना गुंतवणूक करू नका, अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shekhawati Poly Yarn Share Price 533301 on 22 March 2023.

हॅशटॅग्स

Shekhawati Poly Yarn Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x