14 July 2024 6:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक मध्ये तुफान तेजी येण्याचे संकेत Sonata Software Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर खरेदी करा, यापूर्वी दिला 7950% परतावा, श्रीमंत होऊ शकता Railtel Share Price | हा PSU शेअर मालामाल करतोय, शॉर्ट टर्म मध्ये 5 पट परतावा दिला, संधी सोडू नका Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरवर होणार पॉझिटिव्ह परिणाम NBCC Share Price | NBCC सहित हे 3 मल्टिबॅगर शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, मिळेल मजबूत परतावा Inox Wind Share Price | पटापट कमाईची संधी! यापूर्वी 1700% मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर श्रीमंत करणार TCS Share Price | तज्ज्ञांकडून TCS शेअरसाठी BUY रेटिंग, मालामाल करणार शेअर, पुढची टार्गेट प्राइस नोट करा
x

SJVN Share Price | PSU स्टॉक रेटिंग अपग्रेड, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स बुधवारी 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 250 टक्क्यांनी वाढली आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

मागील तीन वर्षांत एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 350 टक्क्यांनी वाढवले आहे. आज गुरूवार दिनांक 13 जून 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 0.83 टक्के घसरणीसह 133.02 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, एसजेव्हीएन स्टॉक पुढील काळात 150 रुपये किमतीवर जाऊ शकतो. हा स्टॉक आपल्या 20 दिवसाच्या दैनंदिन मूव्हिंग ॲव्हरेज पातळीच्या वर ट्रेड करत आहे. तज्ञांनी एसजेव्हीएन स्टॉक खरेदी करताना 124 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 150 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

एसजेव्हीएन कंपनीमध्ये भारत सरकारने 81.85 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मार्च तिमाहीत FIIs चा कंपनीतील वाटा 1.68 टक्क्यांवरून वाढून 2.36 टक्क्यांवर गेला आहे. या कालावधीत DII चा वाटा कमी झाला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीच्या तुलनेत मार्च तिमाहीत DII चा वाटा 5.98 टक्क्यांवरून कमी होऊन 3.36 टक्क्यांवर आला आहे.

एसजेव्हीएन या सरकारी कंपनीचे पूर्वीचे नाव सतलज जल विद्युत निगम लिमिटेड असे होते. ही कंपनी जलविद्युत म्हणजेच पाण्यापासून वीज निर्मिती करते. या कंपनीची स्थापना 1988 मध्ये साली नाथपा झाकरी पॉवर कॉर्पोरेशन म्हणून करण्यात आली होती. एसजेव्हीएन ही कंपनी भारत सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकारने स्थापन केलेला संयुक्त उपक्रम आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 13 June 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x