
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागील दोन वर्षात मल्टीबॅगर परतावा (SJVN Share) कमावून दिला आहे. गेल्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 400 टक्के आणि तीन वर्षांत 430 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात एसजेव्हीएन कंपनीच्या (NSE: SJVN) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5.58 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
16 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 28.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 56,156 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी एसजेव्हीएन स्टॉक 144.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 1.53 टक्के घसरणीसह 138.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जून तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीचे एकूण उत्पन्न 29 टक्के वाढीसह 958.47 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील वर्षीच्या जून तिमाहीत या कंपनीने 744.39 कोटी रुपये कमाई केली होती. एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सचा बीटा 1.8 आहे, जो एका वर्षात उच्च अस्थिरता दर्शवतो. 21 ऑगस्ट 2023 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 55 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. तर 5 फेब्रुवारी 2024 रोजी हा स्टॉक 170.45 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता.
एसजेव्हीएन स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 50.4 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेडिंग करत नाही. एसजेव्हीएन स्टॉक आपल्या 5 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसांच्या SMA पेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. तसेच हा स्टॉक आपल्या 20 दिवस आणि 30 दिवसांच्या SMA पेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील एका वर्षात एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 147 टक्के परतावा कमावून दिला आहे. जून 2023 तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीने 271.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर जून 2024 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 31 टक्के वाढून 357 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचा खर्च 362.60 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर जून 2024 मध्ये या कंपनीचा खर्च वाढून 476.39 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, जर एसजेव्हीएन स्टॉकने 150 रुपये पातळीच्या आसपास ब्रेकआऊट दिला तर हा स्टॉक अल्पावधीत 170 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, या स्टॉकने 130 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. मात्र या स्टॉकला 160 रुपये किमतीवर जोरदार प्रतिकार मिळत आहे. StoxBox फर्मच्या तज्ञांच्या मते, एसजेव्हीएन स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स नकारात्मक उतार प्रदर्शित करत आहे.
आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, एसजेव्हीएन स्टॉकने 140 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला 148 रुपये किमतीवर मजबूत रेझिस्टन्सचा सामना करावा लागत आहे. तज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणूकदार 155 रुपये टारगेट प्राइससाठी एसजेव्हीएन स्टॉक खरेदी करू शकतात. हा स्टॉक पुढील काही महिन्यांत 175 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
एसजेव्हीएन लिमिटेड ही सरकारी कंपनी वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी जल विद्युत, पवन ऊर्जा, आणि सौर ऊर्जा निर्मितीचा व्यवसाय करते. या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये थर्मल पॉवर, हायड्रो पॉवर, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, पॉवर ट्रान्समिशन, सल्लागार आणि पॉवर ट्रेडिंग यांसारख्या कामाचा समावेश होतो.