 
						SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी मालकीच्या हायड्रोपॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. यादरम्यान कंपनीच्या शेअरची किंमत 41 रुपयेवर पोहोचली होती. एसजेव्हीएन कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी एका घोषणेनंतर पाहायला मिळाली होती.
आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.41 टक्के वाढीसह 39.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीने जाहीर केल्या माहिती नुसतं त्यांनी 5,000 मेगावॅट नवीकरणीय उर्जेच्या विकास प्रकल्पांसाठी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी म्हणजेच MAHAGENCO सोबत एक MoU केला आहे.
एसजेव्हीएन कंपनीने MAHAGENCO कंपनीसोबत हायड्रो, पंप्ड स्टोरेज, पवन, सौर, हायब्रीड आणि ग्रीन हायड्रोजनचे विविध नवीकरणीय प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याची व्यवहार्यता तपासण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार केला आहे.
एसजेव्हीएन कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, महाराष्ट्र सरकारद्वारे नूतनीकरणासाठी आणि MAHAGENCO द्वारे चालवल्या जाणाऱ्या आणि देखभाल केल्या जाणाऱ्या छोट्या जलविद्युत केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी जे निविदा काढल्या जाणार आहेत, त्यात SJVN कंपनी आणि MAHAGENCO संयुक्तपणे सामील होणार आहेत. निविदांमध्ये सहभागी होतील .
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हा स्टॉक YOY आधारे 15 टक्के मजबूत झाला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 46.54 टक्के वाढली आहे. सोमवारी SJVN ग्रीन एनर्जी, या एसजेव्हीएन च्या उपकंपनीने भारतीय सौर ऊर्जा महामंडळाने आयोजित केलेल्या टॅरिफ आधारित स्पर्धात्मक बोलीमध्ये 1,400 कोटी रुपये मूल्याचा 200 मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा कंत्राट मिळवला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		