 
						SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स गुरुवारी जबरदस्त तेजीत वाढत होते. ट्रेडिंग दरम्यान हा स्टॉक 3.39 टक्क्यांच्या वाढीसह 123.50 रुपये किमतीवर पोहचला होता. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 2.30 टक्क्याच्या वाढीसह 122.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 267.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
नुकताच एसजेव्हीएन या सरकारी कंपनीला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत नाशिक, सोलापूर, अहमदनगर आणि पुणे येथे 1,352 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीची ऑर्डर देण्यात आली आहे. या प्रकल्प खर्चाचा 30 टक्के खर्च केंद्र सरकार करणार आहे. या 1,352 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी 7,436 कोटी रुपये खर्च येणार आहे. एसजेव्हीएन ही कंपनी मुख्यतः वीज निर्मिती आणि वीज खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय आहे. ही कंपनी हायड्रो पॉवर, विंड पॉवर आणि सोलर पॉवर, तसेच कन्सल्टन्सी आणि ट्रान्समिशन संबंधित व्यवसाय करते.
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीने निव्वळ नफा आणि महसुल संकलनात घट नोंदवली आहे. कंपनीच्या CMD ने एका निवेदनात माहिती दिली की, “मागील वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा PAT 155.64 कोटींनी कमी झाला आहे.
कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पांमधून कमी वीज उत्पादन झाल्यामुळे मागील वर्षीच्या याच तिमाहीतील कमाईच्या तुलनेत डिसेंबर 2023 तिमाहीमध्ये कंपनीच्या कमाईत 2.7 टक्क्यांची घट झाली झाली. तज्ञांच्या मते आर्थिक वर्ष 2024-2025 च्या अखेरपर्यंत एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 230 ते 340 रुपये किमतीवर पोहोचू शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		