 
						Som Distilleries Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘डॉली खन्ना’ यांनी एका मद्य बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज’. ‘डॉली खन्ना’ यांनी ‘सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज’ कंपनीचे 9,53,603 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. ट्रेडलाइन डेटानुसार दिग्गज गुंतवणूकदार ‘डॉली खन्ना’ यांनी मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत ‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीचे 1.29 टक्के भाग भांडवल खरेदी केले ज्याचे एकूण मूल्य 15 कोटी रुपये आहे. ‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.87 टक्के घसरणीसह 151.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Som Distilleries And Breweries Ltd)
1 लाखावर 49 लाख परतावा :
‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीच्या शेअर्सने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना 4815 टक्के परतावा कमावून दिला आहे. 4 मार्च 2005 रोजी ‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीचे शेअर्स 3.07 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 एप्रिल 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 151.65 रुपयेवर पोहचले होते. जर तुम्ही 4 मार्च 2005 रोजी ‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 49.39 लाख रुपये झाले असते.
गुंतवणुकीवर परतावा :
‘सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज’ लिकर कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना सुमारे 144.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. 13 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 65.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीच्या शेअरने YTD आधारे आपल्या गुंतवणुकदारांना 27.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत ‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीचे शेअर्स 27.56 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 162.30 रुपये होती. त्याच वेळी ‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 53.85 रुपये होती.
डॉली खन्ना पोर्टफोलिओ :
ज्येष्ठ गुंतवणूकदार ‘डॉली खन्ना’ यांची ‘रामा फॉस्फेट्स’ कंपनीमधील गुंतवणूक 1 टक्के पेक्षा कमी झाली आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘रामा फॉस्फेट्स’ कंपनीमध्ये ‘डॉली खन्ना’ यांनी 1.54 टक्के भाग भांडवल धारण केले होते. ‘डॉली खन्ना’ यांनी मार्च 2023 च्या तिमाहीत ‘चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन’ आणि ‘तिंन्ना रबर अँड इन्फ्रास्टक्चर’ मधील शेअर्स विकले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		