
Sprayking Agro Equipment Share Price Today | ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या रेकॉर्ड तारीखमध्ये बदल केला आहे. ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली. म्हणजेच कंपनी प्रत्येक तीन शेअर्सवर दोन बोनस शेअर्स मोफत देणार आहे. (Sprayking Agro Equipment Limited)
‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 93.21 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.38 टक्के वाढीसह 147.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
कंपनीचे स्पष्टीकरण :
‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट’ कंपनीच्या संचालक मंडळाने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की,’स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनी आपल्या शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करणार आहे. यासाठी कंपनीने 30 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे.
गुंतवणुकीवर मल्टीबॅगर परतावा :
‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ शेअर्स शुक्रवारी 147 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर क्लोज झाले होते. 145.00 रुपये या मागील कलोजिंग किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत 1.38 टक्के वाढली आहे. ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 565.16 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. YTD आधारावर 2023 या वर्षात ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 251.67 टक्के वधारले आहेत.
सध्या हा स्टॉक आपल्या 1 वर्षाच्या नीचांक किंमत पातळीच्या 631.34 टक्के वाढीव किमतीवर ट्रेड करत आहे. ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीमध्ये 36.41 टक्के भाग भांडवल प्रवर्तकांनी होल्ड केले आहेत, तर 63.59 टक्के भाग भांडवल सार्वजनिक शेअर होल्डरनी धारण केले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.