8 September 2024 3:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून महिन्याला EPF कट होतो? खात्यात जमा होणार 1 लाख रुपये - Marathi News PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा HDFC Mutual Fund | पालकांनो! तुमच्या मुलांसाठी खास योजना, महिना रु.5000 बचतीवर 1.37 कोटी परतावा मिळेल Smart Investment | होय! 15x15x15 या श्रीमंतीच्या फॉर्म्युल्याने बचत करा, दरमहा मिळतील 1 लाख रुपये - Marathi News
x

SRF Share Price | या शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.20 कोटी रुपये परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस, खरेदी करावा का?

SRF Share Price

SRF Share Price | एसआरएफ लिमिटेड या विशेष रासायनिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी हा स्टॉक वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्म निर्मल इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने एसआरएफ लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 2,403.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (SRF Limited)

केमिकल्स स्पेसमध्ये मार्केट लीडर
एसआरएफ लिमिटेड कंपनी स्पेशॅलिटी केमिकल्स स्पेसमध्ये मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते. स्पेशॅलिटी केमिकल्स सेगमेंट मागील पाच वर्षांत पाचपट वाढला असून त्यात आणखी वाढ होऊ शकते असे तज्ञांना वाटते. अशा परिस्थितीत एसआरएफ लिमिटेड कंपनीचे शेअर्स आणखी वाढतील असा विश्वास ब्रोकरेज फर्म निर्मल बंग इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने व्यक्त केला आहे. एसआरएफ लिमिटेड कंपनीचे स्पेशॅलिटी केमिकल सेगमेंटमध्ये 15 प्लांट आणि 4 मल्टी प्रॉडक्ट प्रोडक्शन युनिट्स कार्यरत आहेत. कंपनी आपल्या व्यापार विस्तारासाठी मजबूत भांडवल गुंतवणूक करत आहेत. एसआरएफ लिमिटेड कंपनीचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड मागील दोन वर्षांत वाढला आहे. याशिवाय एसआरएफ लिमिटेड कंपनीने नुकतेच फ्लोरोपॉलिमर्स विभागात एंट्री केली असून ब्रोकरेज फर्म त्याकडे सकारात्मक दृष्ट्या पाहत आहे.

एसआरएफ लिमिटेड कंपनीला विश्वास आहे की, क्लायंट सोबतच्या मजबूत संबंधामुळे कंपनीच्या उत्पादनाच्या मंजुरीचे चक्र कमी होण्यास मदत होईल आणि मध्यम मुदतीत कंपनीच्या बिझनेस मार्केटमध्ये वाढ होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी कंपनी भांडवली खर्च देखील वाढवत आहे. कंपनीने विशेष रसायने आणि फ्लोरोपॉलिमर उत्पादनवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी फ्लोरिन हा महत्त्वाचा घटक असल्याने कंपनीला याचा फायदा होणार आहे. अलीकडे विकसित झालेल्या बहुतेक ऍग्रोकेमिकल्समध्ये फ्लोरिनचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

2021-2028 मध्ये 6 अब्ज डॉलर्स किमतीचे अॅग्रोकेमिकल रेणू पेटंट कालबाह्य होणार असून त्यात 51 टक्के फ्लोरिन सामील आहे. ब्रोकरेज फर्मनुसार, अॅग्रोकेमिकल्स मधील फ्लोरिन ही केमिकल कंपन्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. फ्लोरिनची बाजारपेठ केवळ कृषी रसायनांपूर्ती मर्यादित नसून फार्मास्युटिकल्समध्येही त्याचा वापर होतो. कारण यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने नवीन औषधांच्या वापरासाठी फ्लोरिनची मर्यादा मागील दहा वर्षांत 20 टक्क्यांवरून वाढवून 30 टक्क्यांवर नेली आहे.

एसआरएफ लिमिटेड कंपनीच्या दृष्टीने आणखी एक घटक म्हणजे केमिकल कंपन्या आता चीन व्यतिरिक्त इतर देशांकडे पर्याय व्यापार वृध्दीसाठी कूच करत आहेत. भारतामध्ये या संधीचा फायदा घेण्याची खूप मोठी क्षमता आहे, कारण भारतात विशेष रसायने आणि त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी वेगाने काम चालू आहे. या सर्व बाबींचा विचार करून ब्रोकरेज फर्मने SRF कंपनीच्या शेअरवर 3,000 रुपये लक्ष किंमत देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

शेअर्सची स्थिती
एसआरएफ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 जुलै 2009 रोजी 20.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 2403 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 14 वर्षापूर्वी ज्यानी एसआरएफ लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांना आता 1.20 कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे. 6 जुलै 2022 रोजी SRF कंपनीचे शेअर्स 2002.50 रुपये या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. यानंतर फक्त दोन महिन्यांत एसआरएफ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 43 टक्क्यांनी वाढले आणि 14 सप्टेंबर 2022 रोजी 2864.35 रुपये ही विक्रमी किंमत स्पर्श केली. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 16 टक्के खाली ट्रेड करत आहे. म्हणून तज्ञांनी हा स्टॉक 3000 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SRF Share Price on 31 March 2023.

हॅशटॅग्स

#SRF Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x