26 April 2024 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली
x

Stock Investment | 1 महिन्यात 41 टक्के परतावा, दिग्गजही हा शेअर खरेदी करत आहेत, वेगाने पैसा वाढवतोय हा शेअर

Stock investment, Finotex chemical limited, Share market, BSE, NSE, Stock price, Ashish Kacholia, famous investors,

Stock Investments | शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमावणे ही देखील एक कला आहे. त्यासाठी तुम्हाला जोखिमविरहित शेअर शोधने आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी स्टॉकबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणे खूप गरजेचे असते, नाहीतर पैसे बुडू शकतात. पण शेअर बाजारात असे काही फंडामेन्टली मजबूत स्टॉक आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना खुश केले आहेत. परतावा देण्याच्या बाबतीत हे स्टॉक अव्वल आहेत.आश्याच एक मल्टी बॅगर स्टॉक बद्दल आपण माहिती घेणार आहोत, त्याचे नाव आहे फिनोटेक्स केमिकल्स लिमिटेड.

फिनोटेक्स केमिकल्स लिमिटेड ही अशा काही मल्टी बॅगर कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या भागधारकांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फिनोटेक्स कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांनी वधारले आणि बीएसई निर्देशांकावर प्रति शेअर किंमत 360 रुपये वर पोहोचली होती. फिनोटेक्स कंपनीच्या शेअर्सनी पुन्हा एकदा 409 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत गाठली आहे. मागील एका महिन्यात फिनोटेक्स केमिकल्सच्या शेअरच्या किमतीत 41 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या स्टॉक मध्ये एका प्रसिद्ध दिग्गज गुंतवणूकदारानेही गुंतवणूकदाराने ही गुंतवणूक करून जबरदस्त नफा कमावला आहे.

चालू वर्षात मिळालेला परतावा :
2022 हे वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अस्थिर आणि चढ-उतारांनी भरलेले राहिले आहे. पण फिनोटेक्स केमिकल्सच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी या अस्थिर आणि पडझडीच्या कठीण काळातही भरघोस नफा कमावला आहे. या वर्षी कंपनीच्या शेअरच्या किमतीत 161 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर वर्षभरापूर्वी या फिनोटेक्स शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आतापर्यंत 178 टक्केचा भरघोस परतावा मिळाला आहे. मागील 6 महिन्यांचा चार्ट पॅटर्न पहिला तर आपल्याला असे दिसेल की, कंपनीच्या शेअरच्या किमतीत सुमारे 118 टक्क्यांनी वाढ झाली असून, शेअर्स आपल्या उच्चांक पातळीवरील किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीची वाटचाल :
सेबीला दिलेल्या माहितीत फिनोटेक्स कंपनीने स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडून सध्या लाभांश किंवा बोनसची कोणतीही नवीन घोषणा करण्यात आलेली नाही. एप्रिल 2022 मध्ये जाहीर केलेला वार्षिक निकाल आणि जूनपर्यंतच्या तिमाही निकालांव्यतिरिक्त, शेअरच्या किमतींवर विपरीत परिणाम होईल अशी कोणतीही माहिती कंपनीनं प्रसिद्ध केली नाही. कंपनीने म्हटले आहे की, शेअर्सच्या किमतीत झालेली तेजी ही पूर्णपणे बाजारातील सकारात्मक भावनांमुळे आणि गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आली आहे.

या दिग्गज गुंतवणूकदाराने कमावला भरघोस नफा :
शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी फिनोटेक्स केमिकल्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. BSE निर्देशांकावर उपलब्ध आकडेवारीनुसार आशिष कचोलिया यांनी जून 2022 पर्यंत 21,42,534 शेअर्स होल्ड केले आहेत. त्याच्याकडे कंपनीचा एकूण 1.93 टक्के वाटा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock investment in Finotex chemical limited share price return on 21 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x