 
						Stocks To Buy | शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या गोंधळातही असे काही शेअर्स आहेत ज्यांनी जबरदस्त तेजीचे संकेत दिले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांना आणि गुंतवणूकदारांना या शेअरचे भविष्य उज्ज्वल वाटत आहे. मनीकंट्रोल वेबसाईटच्या अहवालानुसार, ब्रोकरेज हाऊस IDBI कॅपिटलने या वर्षीच्या दिवाळीसाठी काही स्टॉक निवडले आहेत, जे अप्रतिम परतावा कमावून देऊ शकतात. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, हे स्टॉक मुहूर्त ट्रेडिंगमध्ये खरेदी केल्यावर तुमचा पोर्टफोलिओ प्रज्वलित दिव्यासारखा उकळून निघेल.
कोलते-पाटील डेव्हलपर्स:
IDBI कॅपिटलने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, हा शेअर पुढे येणाऱ्या काळात तेजीमध्ये येऊ शकतो. सध्या हा स्टॉक 344 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्म या स्टॉकची लक्ष्य किंमत 460 रुपये जाहीर केली आहे. पुढील दिवाळीपर्यंत हा स्टॉक तुम्हाला 34 टक्के परतावा कमावून देईल अशी अपेक्षा आहे.
अव्हेन्यू सुपरमार्ट्स :
हा स्टॉक सध्याची 4,337 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. IDBI कॅपिटलने या शेअरची लक्ष्य किंमत 5,148 रुपये निश्चित केली असून हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील दिवाळीपर्यंत हा स्टॉक तुम्हाला 19 टक्के परतावा कमावून देईल असा अंदाज IDBI कॅपिटलने व्यक्त केला आहे.
जुबिलंट फूडवर्क्स :
IDBI कॅपिटलचा असा अंदाज आहे की, या स्टॉकमध्ये जबरदस्त परतावा देण्याची क्षमता आहे. सध्या हा स्टॉक 604 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्मचे असे मत आहे की, हा स्टॉक पुढे येणाऱ्या काळात 767 रुपयांपर्यंत वाढू शकतो. पुढील दिवाळीपर्यंत या स्टॉक मध्ये 27 टक्के पर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज आहे.
महिंद्रा CIE ऑटोमोटिव्ह :
हा शेअर सध्या 304 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. IDBI कॅपिटलने या शेअरसाठी 381 रुपये लक्ष किंमत निर्धारित केली आहे. पुढील दिवाळीपर्यंत हा स्टॉक तुम्हाला 25 टक्के अधिक परतावा कमावून देईल अशी अपेक्षा आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		