 
						Stock To Buy | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही होनासा कंझ्युमर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले पाहिजे. या IPO स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करण्याची क्षमता आहे. मामाअर्थ या कंपनीची मूळ कंपनी होनासा कंझ्युमर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 324 रुपये किंमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. Honasa Consumer Share Price
मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 323 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी होनासा कंझ्युमर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के घसरणीसह 315.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ब्रोकरेज फर्म जेफरीजने वित्तीय वर्ष 2023-26 दरम्यान होनासा कंझ्युमर लिमिटेड कंपनीच्या मार्जिनसह होनासा कंझ्युमर स्टॉक वार्षिक 27 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. प्रगत इंटरनेट-प्रथम फ्रेंचायझी म्हणून होनासा कंझ्युमर लिमिटेड कंपनी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याव्यतिरिक्त, होनासा कंझ्युमर लिमिटेड कंपनीच्या एकूण कमाईपैकी एक तृतीयांश कमाई ऑफलाइन व्यवसायातून होते.
Jefferies ने होनासा कंझ्युमर लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 520 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये होनासा कंझ्युमर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 256 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर जेफरीज फर्म या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 103 टक्के वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला होता.
होनासा कंपनी मुख्यतः केसांची निगा राखणारे उत्पादने, त्वचेची निगा, सौंदर्यप्रसाधने आणि इतर वस्तू बनवण्याचे काम करते. होनासा कंझ्युमर लिमिटेड कंपनीचा आयपीओ 31 ऑक्टोबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. कंपनीने आपल्या शेअरची किंमत बँड 308-324 रुपये निश्चित केली होती. अनिण्या कंपनीच्या शेअरची लिस्टिंग फक्त 4 टक्क्यांसह वाढीसह झाली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		