 
						Stocks in Focus | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. मात्र ही चढ-उतार पाहून गुंतवणूकदारांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, हे सध्या गुंतवणूकदारांना कळत नाहीये.
भारतातील दिग्गज ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सखोल संशोधन करून दोन आयटी स्टॉक निवडले आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. या कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतात, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. या कंपन्यांचे नाव आहेत, कोफोर्ज आणि इंडियामार्ट इंटरमेश.
कोफोर्ज शेअर
कोफोर्ज या आयटी क्षेत्रातील कंपनीचे शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.48 टक्क्यांच्या घसरणीसह 4,931 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स 5,900 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी कोफोर्ज कंपनीचे शेअर्स 1.22 टक्के वाढीसह 4,980.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इंडियामार्ट इंटरमेश शेअर
त्याचप्रमाणे शेअर बाजारातील तज्ञांनी इंडियामार्ट इंटरमेश कंपनीच्या शेअरवर 3625 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.82 टक्क्यांच्या घसरणीसह 3071.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. Axis व्यतिरिक्त इतर 16 तज्ञांनी देखील इंडियामार्ट इंटरमेश कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर आज सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी इंडियामार्ट इंटरमेश कंपनीचे शेअर्स 0.063 टक्के वाढीसह 3,082.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		