
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात मजबूत हिरवळ पसरली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा मिळवायचा असेल, तर तुम्ही ब्रोकरेज फर्म ‘के आर चोक्सी’ ने निवडलेल्या स्टॉकवर पैसे लावू शकता. ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी 6 मजबूत स्टॉकची निवड केली आहे. हे शेअर्स पुढील एका महिन्यात तुम्हाला 15 ते 40 टक्के परतावा सहज मिळवून देऊ शकतात. ‘केआर चोक्सी’ फर्मच्या तज्ञांनी सांगितले आहे की, या कंपन्यांची व्यवसाय वाढ सकारात्मक त्यांनी सातत्याने चांगले आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. याशिवाय या कंपन्या त्यांच्या उद्योग क्षेत्रातील सर्वात आघाडीच्या कंपन्या मानल्या जातात. या कंपन्यांचे नेतृत्व व्यवस्थापनही मजबूत आहे. या 6 कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात आश्चर्यकारक परतावा कमावून देऊ शकतात.
क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण :
ब्रोकरेज फर्मच्या मते, Credit Access Grameen Ltd कंपनी MFI सेगमेंटमध्ये चांगल्या स्थितीत व्यापार करत आहे. आणि कंपनी ग्रामीण भागात आपले अस्तित्व मजबूत करण्यावर लक्ष देत आहे.
* रेटिंग : खरेदी करा
* टार्गेट प्राईस : 1,290 रुपये
* अपेक्षित परतावा : 40.2 टक्के
टाटा कंज्यूमर :
ब्रोकरेज फर्मच्या मते या कंपनीच्या व्हॉल्यूममध्ये आणखी सुधारणा पाहायला मिळेल. कंपनीचे मार्जिन पूर्वीपेक्षा चांगले आहेत.
* रेटिंग : खरेदी करा
* टार्गेट प्राईस: 964 रुपये
* अपेक्षित परतावा : 34.5 टक्के
एशियन पेंट्स :
ब्रोकरेज फर्मला कंपनीच्या व्हॉल्यूम आणि मार्जिनमध्ये सुधारणा होण्याची शक्यता वाटते.
* रेटिंग : खरेदी करा
* टार्गेट प्राईस : 3.564 रुपये
* अपेक्षित परतावा : 28.3 टक्के
रोसरी बायोटेक :
ब्रोकरेज फर्मने सांगितले आहे की, महसूल वाढीमध्ये आव्हान असूनही या कंपनीच्या मार्जिनमध्ये सुधारणा पाहायला मिळू शकते.
* रेटिंग : खरेदी करा
* टार्गेट प्राईस : 747 रुपये
* अपेक्षित परतावा : 24 टक्के
HDFC बैंक :
ब्रोकरेज फर्मच्या मते HDFC बँक मजबूत ब्रँड इक्विटीसह सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.
* रेटिंग : खरेदी करा
* टार्गेट प्राईस : 1,960 रुपये
* अपेक्षित परतावा : 21.7 टक्के
गोदरेज कंज्यूमर :
भारतीय बाजारात कंपनीचा वाटा वाढला आहे. इंडोनेशियाकडून कंपनीला चांगला व्यापार मिळत आहे. आणि आफ्रिकन मार्केटमध्ये कंपनीच्या नफ्यात सुधारणा होत आहे. रेटिंग : खरेदी करा
* टार्गेट प्राईस : 1110 रुपये
* अपेक्षित परतावा : 15 टक्के
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.