 
						Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. FII आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता भारतीय शेअर बाजाराचा मूड सकारात्मक पाहायला मिळत आहे. या झंझावाती तेजीत शेअरधारकांना बंपर कमाईची संधी मिळणार आहे. अशा काळात काही तज्ज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी फार्मा क्षेत्रातील शेअर्स निवडले आहेत. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मजबूत कमाई करू शकतात.
ब्रोकरेज फर्म Investec ने ऑर्किड फार्मा स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी ऑर्किड फार्मा स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 800 रुपये टार्गेट प्राईससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 7 डिसेंबर 2023 रोजी ऑर्किड फार्मा कंपनीचे शेअर्स 565.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.58 टक्के वाढीसह 643 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
तज्ज्ञांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार ऑर्किड फार्मा कंपनीच्या नवीन व्यवस्थापनाचे लक्ष कंपनीच्या टर्नअराउंड स्टोरी आणि वाढीवर केंद्रीत आहे. तथापि, या कंपनीचा ऑपरेटिंग नफा म्हणजेच EBITDA मागील 3 वर्षांत दुप्पट झाला आहे. याशिवाय कंपनीने आपल्या कर्जात देखील लक्षणीय घट केली आहे. तज्ञांच्या मते, PLI प्रकल्प ऑर्किड फार्मा कंपनीची एकात्मता मजबूत करेल. आणि API क्षमता आणि यूएस स्थित व्यवसायातील वाढीमुळे कंपनीला अधिक फायदा कमावता होईल.
ब्रोकरेज फर्मच्या मते, आर्थिक वर्ष 2023-26 मध्ये ऑर्किड फार्मा कंपनीची विक्री 24 टक्के CAGR, 38 टक्के EBITDA CAGR आणि 49 टक्के PAT CAGR, राहणे अपेक्षित आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये ऑर्किड फार्मा कंपनीचे शेअर्स 10 टक्के मजबूत झाले आहेत. मागील 6 महिन्यांत ऑर्किड फार्मा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 66 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		