 
						Stocks To Buy | डीएलएफ कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे अनेक ब्रोकरेज फर्म डीएलएफ स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत डीएलएफ कंपनीने 1644 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यात कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 26 टक्के वाढीसह 649 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
या कंपनीने डिसेंबर तिमाहीत 9047 कोटी रुपये सेल्स नोंदवली आहे. मागील आठवड्यात गुरूवारी डीएलएफ कंपनीचे शेअर्स 758 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी डीएलएफ स्टॉक 0.88 टक्के वाढीसह 765.35 रुपये किमतीवर क्लोज झाला आहेत.
डिसेंबर तिमाहीत एकत्रित आधारावर डीएलएफ कंपनीचे एकूण मार्जिन 56 टक्के नोंदवले गेले होते. ऑपरेशनमुळे कंपनीकडे 1108 कोटी रुपये अतिरिक्त कॅश जमा झाली होती. यासह कंपनीची निव्वळ रोकड 1246 कोटी रुपये झाली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने 9047 कोटी रुपये मूल्याची सेल्स नोंदवली आहे. यात वार्षिक आधारावर 261 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने या तिमाहीत अनेक नवीन प्रकल्प देखील लाँच केले आहेत.
डीएलएफ कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत 3 नवीन प्रकल्प सुरू केले आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ 5 दशलक्ष चौरस फूट आहे. विशेषत: कंपनीने गुरुग्राममध्ये सुरू केलेले दोन प्रकल्प पूर्णपणे बुक झाले आहेत. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीची सेल्स बुकिंग 13316 कोटी रुपये नोंदवली गेली होती.
नुवामा फर्मने गुंतवणुकदारांना डीएलएफ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकची टारगेट प्राइस 992 रुपयेवरून वाढवून 1021 रुपये निश्चित केली आहे. म्हणजेच गुंतवणुकदारांना अल्पावधीत 35 टक्के नफा मिळू शकतो. सध्या घरांची मागणी जोरदार आहे. पुढील काही वर्षात पूर्ण होणारे डीएलएफ कंपनीचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. नवीन प्रोजेक्ट लॉन्च करणे, हा कंपनीच्या शेअर्ससाठी सकारात्मक ट्रिगर ठरू शकतो.
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 815 रुपये होती. तर सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 1225 रुपये होती. मागील एका महिन्यात डीएलएफ कंपनीच्या शेअर्सची किंमत 6 टक्के वाढली आहे. तर मागील तीन महिन्यांत कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात डीएलएफ कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 115 टक्के वाढली आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 180 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		