
Stocks To Buy | पुर्वंकरा लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून घसरण पहायला मिळत आहे. मागील तीन दिवसात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे 7.93 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. आज पुर्वंकरा लिमिटेड कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पुर्वंकरा लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के घसरणीसह 372.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( पुर्वंकरा लिमिटेड कंपनी अंश )
आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी पुर्वंकरा लिमिटेड कंपनीचा स्टॉक 4.92 टक्के घसरणीसह 354 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. पुर्वंकरा लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 379 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 75.10 रुपये होती.
सेन्को गोल्ड कंपनीच्या शेअर्सने देखील आपल्या गुंतवणुकदारांना एका महिन्यात 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1066.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 358.45 रुपये होती. शेअर बाजारात मजबूत तेजीत वाढणाऱ्या शेअरमध्ये न्यूलँड लॅब्स कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह 7529.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7610 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1950 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.