 
						Stock To Buy| शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञ विविध स्टॉक गुंतवणुकीसाठी सुचवत असतात. या वेळी गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी ‘गोल्डियम इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते पुढील काळात हा स्टॉक जबरदस्त परतावा कमावून देऊ शकतो. आज या लेखात आपण ‘गोल्डियम इंटरनॅशनल’ कंपनीच्या स्टॉकबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
गोल्डियम इंटरनॅशनल :
रेटिंग : खरेदी करण्याचा सल्ला
शेअरची सध्या किंमत : 150 रुपये
लक्ष्य किंमत : 165/170 रुपये
कालावधी : 4-6 महिने
गुंतवणूक का करावी? :
शेअर बाजारातील तज्ञाच्या मते या कंपनीत गुंतवणूक करून मजबूत परतावा कमावण्याचे संकेत मिळत आहेत. ही कंपनी सोने आणि हिरे संबंधित व्यवसायात गुंतलेली आहे. शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ट्रेडर रमेश दमाणी यांनी देखील या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.56 टक्के वाढीसह 148.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
तज्ज्ञाच्या मते, यूएस मार्केटमध्ये होणारी घसरण आणि आर्थिक मंदीचे संकेत यामुळे ‘गोल्डियम इंटरनॅशनल’ कंपनीच्या शेअरमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील काही काळात या कंपनीचे शेअर्स 180 रुपयेवरून घसरून 119 रुपयेवर आले आहेत. परंतु शेअर बाजारात सौम्य रिकव्हरी असल्याने या कंपनीच्या शेअरमध्ये रिकव्हरी पाहायला मिळत आहे.
कंपनीची मूलभूत तत्त्वे :
‘गोल्डियम इंटरनॅशनल’ कंपनीचे मूलभूत तत्त्वे शेअर बाजाराच्या निकषानुसार खूप चांगले मानले जातात. ही कंपनी ई-कॉमर्स चॅनेलचा वापर उत्तमरित्या करत आहे. सध्या हा स्टॉक 17 च्या पीई मल्टिपलवर ट्रेड करत असून कंपनीचा इक्विटीवर परतावा 21 टक्के आहे. कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण देखील 1.5 टक्के आहे. मागील 3 वर्षात कंपनीच्या नफ्यात सरासरी 31-32 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे. याशिवाय या कंपनीचे 67 टक्के भाग भांडवल प्रवर्तकांनी धारण केले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		