
Stocks to Buy | साउथ इंडियन बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अल्पकाळासाठी गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी तज्ञांनी साउथ इंडियन बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या बँकिंग स्टॉकने मागील काही महिन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. मागील सहा ट्रेडिंग सत्रांपासून या बँकेचे शेअर्स सतत तेजीत व्यवहार करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. (South Indian Bank Share Price)
मागील आठवड्यात अवघ्या सहा दिवसांत साउथ इंडियन बँकेचे शेअर्स 13.5 टक्के वाढले होते. गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी साउथ इंडियन बँकेचे शेअर्स 25.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी साउथ इंडियन बँकेचे शेअर्स 1.49 टक्के घसरणीसह 26.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरची टार्गेट प्राईस
ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टच्या तज्ञांनी पुढील 3 महिन्यांसाठी साउथ इंडियन बँकेच्या शेअर्समध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 25.30-26 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते साउथ इंडियन बँकेचे शेअर्स अल्पावधीत 30 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतात.
गुंतवणूक करताना नुकसान टाळण्यासाठी तज्ञांनी 23.50 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किमतीच्या तुलनेत साउथ इंडियन बँक स्टॉकची लक्ष्य किंमत 15 टक्के अधिक आहे.
12 सप्टेंबर 2023 रोजी साउथ इंडियन बँकेचे शेअर 5.38 टक्के घसरणीसह 22.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आणि दुसऱ्या दिवशी हा स्टॉक 2.84 टक्क्यांच्या वाढीसह 23.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. त्यानंतर साउथ इंडियन बँकेचे शेअर सतत तेजीत वाढत आहेत. रिस्क रिवॉर्ड रेशोचा विचार केला तर 13.5 टक्के डाउनसाइड आणि 15 टक्के अप साईड आहे.
ब्रोकरेज फर्मने दिलेल्या माहितीनुसार साउथ इंडियन बँकेच्या शेअरने 22 रुपये किंमत पातळीवर मजबूत ब्रेकआउट दिला आहे. साउथ इंडियन बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 27.10 रुपये होती.
मागील एका महिन्यात साउथ इंडियन बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील तीन महिन्यांत या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत साउथ इंडियन बँकेच्या शेअरची किंमत 50 टक्के मजबूत झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.