
Stocks To BUY | या स्मॉलकॅप कॅपिटल गुड्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 1 महिन्यात धमाकेदार परतावा मिळवून दिला आहे. ह्या स्टॉकचे नाव आहे, किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 50% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
स्मॉलकॅप कॅपिटल गुड्स कंपनी :
किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड ही एक स्मॉलकॅप कॅपिटल गुड्स कंपनी आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीने उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 50% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. मागील एका महिन्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनीचे शेअर्स 25 रुपयांवरून 37 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या महिन्यात कंपनीचा शेअर 25 रुपयावर ट्रेड करत होता. पण आता तो 37 रुपयेवर ट्रेड करत आहे. त्याच वेळी, या वर्षात आतापर्यंत, कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जवळपास 64% परतावा मिळवून दिला आहे.
1 लाख रुपये गुंतवणुकीचे 1.5 लाख झाले :
किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 1 महिन्यात 53% वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांच्या एक लाख रुपये गुंतवणुकीचे 1.5 लाख रुपये झाले आहेत. किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनीचे शेअर्स 30 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 24.80 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 29 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 37.80 रुपयांवर पोहोचून बंद झाले. जर तुम्ही 1 महिन्यापूर्वी किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमची गुंतवणूक 1.52 लाख रुपये झाली असती.
किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेडचे शेअर्स मागील 5 दिवसात 15% पेक्षा जास्त वधारले आहेत. मागील 5 दिवसात स्टॉकने गुंतवणूकदारांना 15% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. 25 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 32.80 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. कंपनीचे शेअर्सने 29 जुलै 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 37.80 रुपयांची पातळी गाठली. किर्लोस्कर इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये मागील सहा महिन्यांत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 31 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसई वर 27 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते आणि 29 जुलै 2022 रोजी शेअर्स मध्ये वाढ होऊन 37.80 रुपयांवर बंद झाले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.