 
						Subros Share Price | सुब्रोस लिमिटेड या ऑटो एअर कंडिशनिंग सिस्टीम बनवणाऱ्या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स अवघ्या 2 दिवसात 44 टक्के वाढले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 521.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी सुब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.21 टक्के घसरणीसह 452.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या एका घोषणेनंतर सुब्रोस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी पाहायला मिळाली आहे. नुकताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्रक ड्राइव्हवरच्या कॅबिनला वातानुकूलित करण्याचा आदेश काढला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार देशातील सर्व ऑटो उत्पादकांना ट्रक ड्रायव्हर केबिनमध्ये एअर कंडिशनर्स बसवणे अनिवार्य करण्यात आले आहेत. ऑटो इंडस्ट्री कंपनीच्या एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी ही संकल्पना मांडली होती. ते म्हणाले की, मी एका फाईलवर स्वाक्षरी केली आहे ज्यात ट्रक ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये एअर कंडिशनर बसवणे अनिवार्य केले जाणार आहे. ट्रक चालवणाऱ्यां लोकांना आराम मिळेल याची सोय ऑटो कंपन्यांना घ्यावी लागेल, असे नितीन गडकरी म्हणाले.
भारतात ट्रक चालक 43 ते 47 अंश सेल्सिअस तापमानात ट्रक चालवतात. आणि त्यांच्या अशा अडचणीच्या स्थितीत काम करावे लागते. म्हणून नितीन गडकरी यांनी हा नवीन निर्णय घेतला आहे. सुब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 57.11 टक्के वाढले आहेत. 2 जानेवारी 2023 रोजी सुब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 306.85 रुपयेवर ट्रेड करत होते.
21 जून 2023 रोजी सुब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 521.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 272 रुपये होती. तर मार्च 2023 च्या तिमाहीत सुब्रोस लिमिटेड कंपनीने 748.11 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि त्यात कंपनीने 18.64 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		