3 February 2023 8:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | टॉप 10 शेअरची लिस्ट, अल्पावधीत देतील 60 टक्क्यांपर्यंत परतावा, कमाईची मोठी संधी Sharda Cropchem Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 400% परतावा देणारा मल्टिबॅगेर शेअर खरेदी करण्याचा तज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा Horoscope Today | 04 फेब्रुवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर शेअर, 9 महिन्यांत 200% परतावा, शेअर खरेदी करावा का? Sunteck Realty Share Price | लॉटरी शेअर! फक्त 59 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, आता अजून 70% मिळेल Numerology Horoscope | 04 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Income Tax Slab 2023 | वार्षिक पगार 12 लाख रुपये आहे का? नव्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये 5 पट टॅक्स भरावा लागणार
x

Sula Vineyards Share Price | शेअर लिस्टिंगवेळी तोटा, मात्र आता गुंतवणुकदार छापत आहेत नोटा, शेअर सुसाट तेजीत, डिटेल्स पहा

Sula Vineyards Share Price

Sula Vineyards Share Price | ‘सुला व्हाइनयार्ड्स’ कंपनीच्या शेअरमध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यावर या वाईन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी सुरू झाली आहे. मागील 6 ट्रेडिंग सेशनमध्ये या वाईन कंपनीचे शेअर्स 32 टक्के मजबूत झाले आहेत. ‘सुला व्हाइनयार्ड्स’ कंपनीच्या शेअरची किंमत मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी 2.11 टक्के कमजोरीसह 417.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने 432.40 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या शेअरने सलग चौथ्या दिवशी विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीचा IPO डिसेंबर 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. तेव्हापासून स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव होता मात्र स्टॉक आता तेजीत आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sula Vineyards Share Price | Sula Vineyards Stock Price | BSE 543711 | NSE SULA)

शेअरमध्ये तेजी येण्याचे कारण :
सुला वाईन कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे दोन प्रमुख कारणे म्हणजे डिसेंबर 2022 या तिमाहीत कंपनीने बंपर सेल्स केले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत सुला वाईन कंपनीच्या ब्रँड विक्रीत 13 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. नुकताच जाहीर झालेल्या नवीन शेअरहोल्डिंग डेटानुसार दिग्गज ट्रेडर मुकुल अग्रवाल यांनी डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये सुला वाईन कंपनीचे 1.9 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत.

तिमाही निकाल :
डिसेंबर 2022 या तिमाहीत ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीने 165.7 कोटी रुपये सेल्स केले आहे. त्याच वेळी कंपनीने डिसेंबर 2022 या तिमाहीत 187.2 कोटी रुपये ब्रँड सेल्स केले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या सुरुवातीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीची ब्रँड विक्री 28 टक्के मजबूत झाली आहे. आणि सुला वाईन कंपनीच्या वाइन पर्यटनातून होणाऱ्या कमाईत 13 टक्के वाढ झाली असून कंपनीने 23 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

मुकुल अग्रवाल यांची गुंतवणूक :
मुकुल अग्रवाल यांच्या पोर्टफोलिओमध्ये सुला वाईन कंपनीचे 16,00,000 शेअर्स आहेत. हे प्रमाण एकूण भाग भांडवलाच्या 1.9 टक्के आहे. बीएसई इंडेक्सवर शेअरची शेवटची कलोजिंग किंमत 365.20 रुपये होती. आज मंगळवारी शेअरची किंमत 417.25 रुपये वर आली आहे.

सुला वाईन कंपनीचा IPO 12 ते 14 डिसेंबर 2022 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. कंपनीने IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत बँड 340-357 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचे शेअर्स 22 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंज इंडेक्समध्ये सूचीबद्ध झाले होते. स्टॉक ची लिस्टिंग डिस्काउंटमध्ये झाली होती, मात्र स्टॉक आता तेजीत आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sula Vineyards Share Price 543711 stock market live on 24 January 2023.

हॅशटॅग्स

Sula Vineyards Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x