1 April 2023 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | चक्रवाढ व्याजासह मोठा परतावा आणि टॅक्सची बचत, दुहेरी फायद्याची पोस्ट ऑफिस योजना जाणून घ्या Multibagger Mutual Fund | श्रीमंत व्हायचय? या 5 शक्तिशाली म्युचुअल फंड योजना 1 वर्षात 133 टक्के परतावा देत आहेत, नोट करा LIC Policy Surrender | LIC पॉलिसी मॅच्युरिटीपूर्वीच बंद करायची आहे? सरेंडर नियमात नफा-नुकसान पहा Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स IRCTC Railway Ticket | अचानक गाव-शहरात ट्रेनने जावं लागतंय अन तिकीट नाही? नो टेन्शन, हा नियम मदत करेल Post Office Scheme | या सरकारी मासिक उत्पन्न योजनेत शून्य रिस्कवर गुंतवणूक करा, दरमहा 4950 रुपये मिळतील, पूर्ण माहिती जाणून घ्या Deep Industries Share Price | हा शेअर स्प्लिट होतोय, शेअरची किंमत पाच पट घटणार, खरेदी करणार?
x

Suryalata Spinning Mills Share Price | या शेअरने 1 महिन्यात पैसे दुप्पट केले, स्टॉक मध्ये आणखी वाढ होणार

Suryalata Spinning Mills Share Price

Suryalata Spinning Mills Share Price | शेअर बाजारात कोणता शेअर गुंतवणूकदारांना मालामाल बनवेल याचा अंदाज लावणे अवघड आहे. पण शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, जे लोक शेअर बाजारात हुशारीने पैसे लावतात, ते लोक जबरदस्त परतावा कमावतात. शेअर बाजारात स्मॉल-कॅप शेअर्स आणि मिड-कॅप शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणुक केल्यास मजबूत परतावा मिळतो. ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 300 रुपयांवरून वाढून 620 रुपयांवर पोहचले आहेत. या काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. तथापि, मागील एका महिन्यात शेअर धारकांचे पैसे दुप्पट करूनही ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के वाढीसह 703.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअरमध्ये तेजीचे संकेत :
‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1,167 रुपये पर्यंत वाढू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. मागील पाच दिवसात ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 31.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात 126.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या स्टॉकने 109.55 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात शेअरची किंमत 105.39 टक्के वाढली आहे.

तज्ज्ञांनी हा मल्टीबॅगर शेअर अधिक नफ्यासाठी होल्ड करण्याची शिफारस केली आहे. चॉईस ब्रोकिंग फर्मचे तज्ञ म्हणाले, “मागील 15 सत्रांपासून ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. स्टॉक धारकांनी 570 रुपयेवर स्टॉप लॉस लावून गुंतवणूक केल्यास मजबूत फायदा होईल.

‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स लिमिटेड’ या स्मॉल-कॅप कंपनीचे मल्टीबॅगर स्टॉक BSE इंडेक्सवर ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहेत. या कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल अंदाजे 264 कोटी रुपये आहे. मागील काही सलग ट्रेडिंग सेशनमध्ये या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये जबरदस्त तेजी नोंदवली आहे. ‘सूर्यलता स्पिनिंग मिल्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 635 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 272.40 रुपये प्रति शेअर होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suryalata Spinning Mills Share Price return on investment on 11 March 2023.

हॅशटॅग्स

Suryalata Spinning Mills Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x