
Suzlon Energy Share Price | ‘सुझलॉन एनर्जी’ या ऊर्जा क्षेत्रातील कंपनीमध्ये व्यवस्थापन स्तरावर मोठे फेरबदल पाहायला मिळत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने ‘जेपी चालसानी’ यांना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ म्हणून नियुक्त केले आहे. अश्विनी कुमार यांच्या जागेवर ‘जेपी चालसानी’ यांना नियुक्त करण्यात आले आहेत. ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीने काल सेबीला कळवले की, 5 एप्रिल 2023 रोजी अश्विनी कुमार यांनी वैयक्तिक कारणांमुळेपासून आपल्या सीईओ पदाचा राजीनामा देऊन पाडत्याग केला होता. आज गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के वाढीसह 8.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Suzlon Energy Limited)
4 एप्रिल 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीच्या संचालक मंडळाने झालेल्या बैठकीत ‘जे पी चालसानी’ यांना सीईओ म्हणून नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ‘जे पी चालसानी’ 5 एप्रिल 2023 पासून आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारतील. एप्रिल 2016 ते जुलै 2020 पर्यंत ‘जे पी चालसानी’ सुझलॉनचे ग्रुप सीईओ म्हणून काम करत होते. त्यानंतर ते सुझलॉन समूहात धोरणात्मक सल्लागार म्हणून रुजू झाले. चालसानी यांना वीज क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात काम करण्याचा 40 वर्षांचा दीर्घ अनुभव आहे.
शेअर्सची कामगिरी :
4 जानेवारी 2008 रोजी ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 375 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. याकाळात शेअरची किंमत 98 टक्के घसरली असून 8 रुपयांवर आली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या स्टॉकने कंगाल केले आहे. या वर्षी YTD आधारे ‘सुझलॉन एनर्जी’ स्टॉक 25 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 18.17 टक्के कमजोर झाली आहे. ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 5.43 रुपये होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 12.19 रुपये होती.
कंपनीची आर्थिक कामगिरी :
‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये मागील तिमाहीचे तुलनेत दुप्पट नफा कमावला आहे. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफा दुप्पट होऊन 78.28 कोटी रुपयेवर पोहचला होता. कंपनीने आपल्या खर्चात कपात केली असल्याने तिमाही नफ्यात वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीने 36.77 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीचे महसूल उत्पन्न 1,615 कोटी रुपयांवरून कमी होऊन 1,464 कोटी रुपयांवर आले होते. या काळात कंपनीचा एकूण खर्चही कमी होऊन 1,386 कोटी रुपयांवर आला होता. एक वर्षभरापूर्वी याच तिमाही काळात कंपनीचा एकूण खर्च 1,573 कोटी रुपये होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.