Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सच्या तेजीनंतर उत्सुकता वाढली आणि टार्गेट प्राईस सुद्धा वाढली, तज्ज्ञांनी काय म्हटले वाढीबाबत?

Suzlon Share Price | पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स काल 22.86 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये तेजी नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 22.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 176 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 6.60 रुपये होती. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला 64 विंड टर्बाइन पुरवण्याची ऑर्डर मिळाली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीला 02 पॉवर प्रायव्हेट लिमिटेडकडून 201.6 मेगावॅट क्षमतेची ऑर्डर प्राप्त झाली आहे. ही ऑर्डर सुझलॉन एनर्जी कंपनीच्या 3MW सिरीज विंड टर्बाइनसाठी देण्यात आली आहे. ही ऑर्डर सुझलॉन एनर्जी कंपनीच्या नवीन 3MW टर्बाइनसाठी मिळालेली सर्वात मोठी ऑर्डर मानली जात आहे.
या ऑर्डरच्या माध्यमातून सुझलॉन एनर्जी कंपनी 64 विंड टर्बाइनची मागणी असलेली सर्वात मोठी ऑर्डर पूर्ण करणार आहे. या विंड टर्बाइनची रेटेड क्षमता 3.15 मेगावॅट आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी विंड टर्बाइनचा पुरवठा तर करणार आहेच, सोबत ऊर्जा निर्मिती प्रकल्प देखील उभारणार आहे.
शेअर बाजारातील तज्ञ सुझलॉन शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहे डोमेस्टिक ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शिअल फर्मने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरवर 30 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज हाऊसने सुझलॉन स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शिअल फर्मच्या मते सुझलॉन एनर्जी शेअर्स पुढील काळात 35 टक्के नफा देऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suzlon energy Share Price today on 26 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER