
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर सोमवार ११ नोव्हेंबर रोजी 0.96% घसरून 61.90 रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. जुलै महिन्यात सुझलॉन शेअर ६० रुपयांच्या खाली घसरला होता. मात्र मार्च २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये प्रचंड तेजी दिसून आली. या कालावधीत सुझलॉन शेअर ९१३ टक्क्यांनी वाढला आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
मल्टिबॅगर परतावा दिला
सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये ५ वर्षांत २६०० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. या कालावधीत सुझलॉन शेअर 1 रुपयावरून सध्याच्या किमतीवर पोहोचला आहे. सुझलॉन शेअर एका वर्षाच्या उच्चांकी ८६ रुपयांच्या तुलनेत २८ टक्क्यांनी घसरला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण मार्केट कॅप 84,140 कोटी रुपये आहे.
एंजल वन फर्मच्या तज्ज्ञांनी काय म्हटले
एंजल वन फर्मचे तज्ज्ञ ओशो कृष्ण म्हणाले की, “सुझलॉन एनर्जी शेअर 86 रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून जवळपास 30 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच स्तरनिहाय ६० ते ५५ रुपयांच्या रेंजमध्ये घसरण थांबू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सुझलॉन शेअरला ७० ते ७२ रुपयांच्या आसपास स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे.
शेअर दैनंदिन चार्ट
सेबीचे नोंदणीकृत स्टॉक मार्केट तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन यांनी सांगितले की, सुझलॉन एनर्जी शेअर सध्या घसरत आहे, परंतु दैनंदिन चार्टवर सुझलॉन शेअरला 58 रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे. सुझलॉन शेअर ७९ रुपयांवर पोहोचू शकतो, मात्र गुंतवणूकदारांनी ६६.६ रुपयांच्या रेझिस्टन्स लेव्हलपेक्षा वर असेल तरच शेअर्स खरेदी करावा.
कंपनीचा सीईओंचा राजीनामा
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, सुझलॉन एनर्जी कंपनीचे न्यू बिझनेसचे CEO ईश्वरचंद मंगल यांनी 8 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.