
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसायात करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. एकेकाळी या कंपनीवर 17,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज होते, मात्र आता ही कंपनी कर्जमुक्त झाली आहे. तसेच सध्या या कंपनीकडे आजपर्यंतच्या सर्वाधिक ऑर्डर्स आहेत.
मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2300 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 52.19 रुपये आहे. तर नीचांक किंमत पातळी 11.37 रुपये आहे.
शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.20 टक्के वाढीसह 49.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 3 एप्रिल 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 6 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 49.67 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 4 वर्षे आणि 2 महिने या काळात सुझलॉन एनर्जी स्टॉक तब्बल 2359 टक्के वाढला आहे.
जर तुम्ही 3 एप्रिल 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 24.58 लाख रुपये झाले असते. 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्याच्या किमतीनुसार मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 245 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 2 वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 495 टक्के उसळी पाहायला मिळाली आहे. पवन ऊर्जा निर्मिती व्यवसायात गूंतलेल्या या कंपनीचे शेअर्स 3 जून 2022 रोजी 8.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 67570 कोटी रुपये आहे. 2010 मध्ये या कंपनीचे बाजार भांडवल 8000 कोटी रुपये होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.