
Suzlon Share Price | मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी आणि आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
ICICI सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी आणि आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात. यासाठी तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 48 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आणि आयनॉक्स विंड स्टॉकवर 675 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
आज बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के घसरणीसह 37.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 450.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 380 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 6.96 रुपये होती. तर 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 50.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने 27 फेब्रुवारी 2024 रोजी 648 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीने मागील तीन वर्षांत आपले कर्ज कमी करण्यावर अधिक भर दिला आहे. याशिवाय कंपनीला मोठ्या ऑर्डर्स देखील मिळाल्या आहेत. सुझलॉन कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार प्रचंड आहे.
आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स मंदीच्या गर्तेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. INOX विंड कंपनीच्या कर्जात मोठी वाढ झाली होती, ते आता कंपनी कमी करत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये या कंपनीचे निव्वळ कर्ज 470 कोटी रुपयेवर येईल. आयनॉक्स विंड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत 1,829 मेगावॅट क्षमतेच्या ऑर्डर मिळवल्या आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.