
Suzlon Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या तेजीचा फायदा घेण्यासाठी देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले होते. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 40-50 रुपये किमतीच्या दरम्यान ट्रेड करत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
सुझलॉन एनर्जी कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 6,500 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, त्यात कंपनीचा निव्वळ नफा 660 कोटी रुपये नोंदवला गेला होता. 2023-2024 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीकडे 365 कोटी रुपये कॅश इन हॅण्ड होते. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.86 टक्के घसरणीसह 49.44 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. एंट्री पॉईंटच्या दृष्टीकोनातून सुझलॉन एनर्जी स्टॉक सध्या ओव्हरव्हॅल्यूड झाला आहे.
नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीचे स्वतंत्र संचालक मार्क डेसडेलर यांनी 8 जून 2024 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मार्क यांनी कंपनीच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या पातळीवर आणि पारदर्शकतेबद्दल असंतोष व्यक्त केला होता. तथापि, त्यांनी कंपनीतील कोणत्याही आर्थिक किंवा कायदेशीर अनियमिततेची तक्रार केली नाही. मागील 15 महिन्यांपासून सुझलॉन एनर्जी कंपनी आपले कर्ज कमी करण्यासाठी आणि खेळते भांडवल अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
यासर्व बाबी विचारात घेऊन ब्रोकरेज ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील काही महिन्यांत 60 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील आठवड्यात सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.74 टक्क्यांनी घसरला होता. तर मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 23.09 टक्क्यांनी वाढले होते.
मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी स्टॉक 32.52 टक्के वाढला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 243.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 550.07 टक्के आणि तीन वर्षांत 665.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 1205.28 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.