 
						Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या भारतातील आघाडीच्या अक्षय ऊर्जा कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4 टक्के वाढीसह 44.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. काही तज्ञांनी तर हा स्टॉक 50 रुपयेपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.65 टक्के वाढीसह 46.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी या कंपनीचे शेअर्स 9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 45 रुपयेच्या पार गेला आहे. मार्च 2024 च्या सुरुवातीपासून सुझलॉन एनर्जी स्टॉकने 43 ते 44 रुपये दरम्यान मजबूत प्रतिकार तयार केला आहे.
तज्ञांचा असा विश्वास आहे की जर हा स्टॉक 45 रुपये किमतीच्या वर टिकला तर शेअर 48-50 रुपयेपर्यंत जाऊ शकतो. सुझलॉन एनर्जी हा पवन ऊर्जा क्षेत्रात व्यावसाय करणाऱ्या कंपनीची उपस्थिती जगभरात 17 देशांमध्ये आहे. या सध्या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 59993.03 कोटी रुपये आहे. S&P BSE 500 इंडेक्सने मागील दोन वर्षांत गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		