 
						Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी भारतातील सर्वात मोठी पवन ऊर्जा कंपनी आहे. ही कंपनी मागील काही दशकापासून कर्जाच्या विळख्यात अडकली आहे. कंपनीचे संस्थापक तुलसी तंती यांचे निक्तच निधन झाले, आणि स्टॉकने कमावलेली थोडीफार तेजी जी पूर्णतः गमावली आहे. संस्थापकाचे निधन झाल्यावरही कंपनीला आपले राइट्स इश्यू पूर्ण होतील असा विश्वास आहे. कंपनी आपला राइट्स इश्यू 11 ऑक्टोबर रोजी खुला करणार आहे, आणि त्याची अंतिम मुदत 20 ऑक्टोबर 2022 आहे.
कंपनीची धडपडती कामगिरी :
1995 साली सुझलॉन एनर्जी कंपनीची स्थापना कंपनीचे संस्थापक तुलसी तंती यांनी केली होती. काही वर्षातच कंपनी भारतातील सर्वात आघाडीची अक्षय ऊर्जा निर्मिती कंपनी बनली. मागील काही वर्षे या कंपनीसाठी अत्यंत कठीण होते. 1 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीचे संस्थापक तुलसी तंती यांचे निधन झाले, आणि शेअरची जबरदस्त गडगडली.
कंपनीने तुलसी तंती यांचे भाऊ विनोद तंती यांची नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. आणि कंपनीने आता पूर्व-निर्धारित वेळापत्रकानुसार जाहीर केलेले राईट्स इश्यू जारी ठेवण्याचा निर्णय घेतला. या राइट्स इश्यूद्वारे कंपनी 1,200 कोटी रुपयेचा फंड उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. suzlon कंपनीला नुकताच REC आणि IREDA कडून 2,800 कोटी रुपयांचे पुनर्वित्त सहाय्य मिळाले आहे.
सुझलॉन एनर्जीने नुकताच अधिकृत विधान केले आहे की, कंपनीची मुख्य समस्या वित्त व्यवस्थापन करणे ही आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की “आमची समस्या उत्पादन, तंत्रज्ञान किंवा ऑर्डरची कमतरता नसून फंड व्यवस्थापन करणे ही आहे. अगदी वाईट काळातही, आम्ही बसवलेल्या टर्बाइनची योग्य काळजी घेतली आहे. आणि आमच्या सध्याच्या 2,000 कोटी रुपयांच्या एकूण महसूल उत्पन्नातील 1,800 कोटी रुपये सेवां पुरवठामधून येतात”.
आर्थिक अडचणी :
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंगच्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम बँक गॅरंटी म्हणून द्यावी लागते, पण कंपनी बँक गॅरंटी देण्यास आर्थिकरित्या सक्षम नाही. बँका कंपनीला खेळते भांडवल म्हणून वापरण्यासाठी कर्जही द्यायला तयार नाही. परंतु अलीकडेच REC च्या 2,800 कोटी रुपयांच्या पुनर्वित्त सहाय्यसह कंपनी आर्थिक संकटातून बाहेर आली आहे, आणि कंपनी REC आणि IREDA ने दिलेल्या वित्त सहाय्यामुळे सुझलॉन एनर्जीच्या 3,000 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली जाईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		