
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अफाट नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 109.78 टक्के मजबूत झाले आहेत. आणि शेअरची किंमत 8 रुपयेवरून वाढून 18 रुपयेवर पोहचली आहे. (Suzlon Energy Share Price)
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 18 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.64 टक्के वाढीसह 19.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
तिमाही नफा :
नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून 2023 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 96 टक्के वाढीसह 101 कोटी रुपये एकात्मिक निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीने सेबी ला दिलेल्या माहिती आर्थिक निकालातील तपशील कळवले आहे. या कंपनीने मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीत 2,433 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता.
महसूल संकलन आणि शेअर्सवर परतावा :
सुझलॉन एनर्जी कंपनीने जून 2023 तिमाहीत 1348 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर महिला आर्थिक वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 1,378 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. 2008 मध्ये या कंपनीचे शेअर्स 373 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांचा जोरदार तोटा केला आहे. मात्र आता या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. अवघ्या सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.