
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी कंपनीच्या शेअरने मंगळवारी पुन्हा एकदा लोअर सर्किट हीट केला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरणीसह 26.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स ASM स्टेज IV श्रेणीमध्ये सामील करण्यात आले आहेत. Suzlon Energy Share Price
9 ऑक्टोबर 2023 या कंपनीचे थेट स्टेज IV मध्ये ट्रेड करत आहेत. यामुळेच हा स्टॉक सतत लोअर सर्किट हीट करत आहे. ASM म्हणजे, यामध्ये सेबीव्दारे स्टॉकवर अतिरिक्त निरीक्षण ठेवले जाते. आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 27.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स एएसएम अंतर्गत येत असल्यास, जर कोणी गुंतवणुकदार जाणूनबुजून शेअरची किंमत वाढवत असेल किंवा कमी करत असेल तर त्याच्या अशा गैर व्यवहाराला प्रतिबंध घालता येईल. तथापि, जेव्हा एखादा स्टॉक ASM अंतर्गत सामील होतो, तेव्हा शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात नफा वसुली पाहायला मिळते. सध्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये अशीच नफा वसुली पाहायला मिळत आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून एकतर्फी तेजी पाहायला मिळत होती. त्यामुळेच गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सेबीने काही पाऊले उचलली आहेत. परंतु कंपनीचे शेअर्स या ASM गटातून लवकरच बाहेर येतील असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. त्याचबरोबर विविध म्युच्युअल फंड कंपन्यांनी देखील या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.