
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 2.50 टक्क्यांच्या घसरणीसह 17.53 रुपये किमतीवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 21,945.96 कोटी रुपये आहे. (Suzlon Energy Share Price)
नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला गुजरातमधील KP समूहाकडून 47.6 MW पवन ऊर्जा क्षमतेचा प्रकल्प उभारणीची ऑर्डर देण्यात आली आहे. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के घसरणीसह 17.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने 2,000 कोटी रुपये भांडवल उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी भांडवल उभारण्यासाठी विविध आर्थिक पर्याय शोधत आहेत. तांत्रिक चार्टवर सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरला 19 रुपये किमतीवर जबरदस्त प्रतिकार मिळत आहे. 16.65 रुपये किमतीवर स्टॉकला मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. त्यानंतर 15.80 रुपये आणि 12 रुपये, 10 रुपये लेव्हलवर स्टॉकला मजबूत सपोर्ट मिळत आहे.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 21 रुपयेपर्यंत वाढू शकतो. सुझलॉन एनर्जी कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीच्या निकालात जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केले होते. त्यानंतर सुझलॉन एनर्जीच्या स्टॉकची किंमत तेजीत वाढली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने आपला खर्च कार्यक्षमतेने व्यवस्थापित करून कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ केली आहे. कंपनीचा ऑपरेटिंग मार्जिन देखील 500 बेसिस पॉइंट्सने वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.