
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मागील क्लोजिंग किमतीच्या तुलनेत 4 टक्के पेक्षा जास्त घसरले होते. हा स्टॉक दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये 4.19 टक्के कमजोरीसह 19.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के वाढीसह 19.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Suzlon Energy Share Price)
शेअरची 52 आठवड्यांची पातळी
सुझलॉन एनर्जीचे एकूण बाजार भांडवल 26,634 कोटी रुपये आहे. 25 जुलै 2023 रोजी सुझलॉन कंपनीचे शेअर्स 21.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 13 ऑक्टोबर 2022 रोजी हा स्टॉक 6.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.
मागील 6 महिन्यांत शेअरने 130.41 टक्के परतावा दिला
मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 130.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 8 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहचली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सवर 64.7 अंकावर ट्रेड करत आहेत. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.
तज्ज्ञांकडून शेअरची टार्गेट प्राईस जाहीर
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सचा बीटा 1.6 असून तो वाढत्या खूप उच्च अस्थिरतेचे संकेत देत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स स्टॉक 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसांच्या सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे. मात्र हा स्टॉक आपल्या 5 दिवसांच्या सरासरी किमतीपेक्षा खाली ट्रेड करत आहे. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअरने 8 रुपये किंमत पातळीवरून चांगली कामगिरी केली आहे. नुकताच हा स्टॉक 20.80 रुपये उच्चांक पातळीला स्पर्श करून 17-18.50 रुपये दरम्यान ट्रेड करत आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात हा स्टॉक 34 रुपये पर्यंत वाढू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.