
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात वाढत होता. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 19.66 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Suzlon Energy Share Price)
या कंपनीच्या शेअरने काल आपली 52 आठवड्यांची किंमत पातळी स्पर्श केली होती. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर 5 टक्के वाढीसह 18.73 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षात सुसाट वेगात धावले आहेत. यातून गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा मिळाला आहे. मागील 3 वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 873 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
21 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 19.66 रुपये किमतीवर पोहचला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5.43 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 253 टक्के नफा कमावून दिला आहे.
28 जुलै 2022 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 21 जुलै 2023 रोजी 19.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 102 टक्के नफा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 23 जानेवारी 2023 रोजी 9.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने लोकांना 41 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.