
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मे 2023 पासून मजबूत तेजी पाहायला मिळतं आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 52.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 17.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Suzlon Energy Share Price)
तुम्ही एक महिन्यापूर्वी सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये पैसे लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 50 टक्के पेक्षा अधिक वाढले असते. आजसुझलॉन कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 15.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज स्टॉक 17 रुपयेवर पोहचला आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील दीड महिन्यापासून तेजी पाहायला मिळत आहे. शेअर अवघ्या दीड महिन्यात 8.20 रुपयेवरून 17 रुपयेवर पोहचला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 100 टक्क्यांहून अधिक परतावा कमावला आहे. मागील एका महिन्यात शेअरची किंमत 11 रुपयेवरून वाढून 16.80 रुपयेवर पोहचली आहे. या कालावधीत शेअरची किंमत 50 टक्के वाढली आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे.
जर तुम्ही सुझलॉन एनर्जी कंपनीचे मागील पाच दिवसांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, शेअरची किंमत 16.39 टक्के वाढली आहे. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 69.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 18.45 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 5.42 रुपये होती.
ICICI सिक्युरिटीज फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन शेअरची लक्ष किंमत 22 रुपये जाहीर केली आहे. 26 मार्च 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.51 रुपयेवर ट्रेड करत होते. तर 9 जानेवारी 2008 रोजी हा स्टॉक 431 रुपयेवर ट्रेड करत होता. तज्ञांनी स्टॉक चे निरीक्षण करून शेअरची किंमत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सुझलॉन एनर्जी ही कंपनी मुख्यतः अक्षय ऊर्जा निर्मिती आणि पुरवठा व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनी सध्या 17 देशांमध्ये व्यवसाय करत आहे. ही कंपनी भारतात 13.9 GW क्षमेतेचे पवन ऊर्जा प्रकल्प हाताळत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.