 
						Swastik Pipes IPO | बऱ्याच महिन्यापासून शेअर बाजारात एक चांगला IPO आला नाही जो आपल्या गुंतवणूकदारांच्या नुकसानीची भरपाई करून देईल. पण आता एक चांगली बातमी आली आहे. स्वस्तिक पाइप लिमिटेडने नुकताच आपला IPO जाहीर केला आहे, आणि आपल्या शेअरसाठी 97 रुपये ते 100 रुपये प्रति इक्विटी शेअर किंमत निश्चित केली आहे. IPO इश्यू मध्ये बुक-बिल्डिंगद्वारे 10 चे दर्शनी मूल्याचे 62.52 लाख इक्विटी शेअर्स विक्रीसाठी बाजारात आणले जातील. 29 सप्टेंबर 2022 रोजी हा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल आणि 03 ऑक्टोबर 2022 रोजी IPO बंद होईल. तुखी ह्या IPO मध्ये 29 सप्टेंबर पासून बोली लावू शकता.
HNI साठी 50 टक्के राखीव :
प्रत्येक IPO मध्ये कंपनी आपल्या वेगवेगळ्या गटातील गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्स राखीव ठेवत असते. त्याप्रमाणे 50 टक्के शेअर्स इश्यू HNI साठी राखीव ठेवण्यात आले आहे.आणि या पब्लिक इश्यूमध्ये 50 टक्के शेअर्स रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या SME चे उद्दिष्ट आपल्या IPO इश्यूमधून 62.52 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष आहे. स्वस्तिक पाईप्स कंपनी 1973 सालापासून सॉफ्ट स्टील आणि कार्बन स्टील इलेक्ट्रिक-रेझिस्टन्स-वेल्डेड ब्लॉक आणि गॅल्वनाइज्ड पाईप्स, ट्यूब्सचे उत्पादन, विपणन, आणि निर्यात करते.
कंपनीचा व्यापार सविस्तर :
स्वस्तिक पाईप्स कंपनीचे हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्यात दोन उत्पादन केंद्र आहेत. या उत्पादन केंद्रांची उत्पादन क्षमता दरमहा 20,000 मेट्रिक टन एवढी आहे. या IPO मधून उभारलेला पैसा कंपनी आपल्या उद्योगात लागणाऱ्या खेळत्या भांडवलासाठी वापरणार आहे. swastik Pipes कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, BHEL, COAL इंडिया, DMRC, IEL, हिंदुस्तान झिंक, L&T, नाल्को, NTPC, ABB लिमिटेड अश्या दिग्गज मोठ्या कंपनीचा समावेश होतो. त्याचे जगभर पसरले आहेत, त्यापैकी प्रमुख देश म्हणजे यूएसए, यूके, यूएई, ऑस्ट्रेलिया, कतार, जर्मनी पासून बेल्जियम, मॉरिशस, इथिओपिया आणि कुवेत आहे. अश्या अनेक देशांमध्ये Swastik Pipes चा उद्योग पसरला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		