Symphony Share Price | कुलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3,00,000 टक्के परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 30 कोटी, स्टॉक डिटेल्स

Symphony Share Price| भारतातील प्रसिद्ध कूलर निर्माता कंपनी ‘सिम्फनी लिमिटेड’ च्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळात मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘सिम्फनी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 300000 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.

शेअर्स 28 पैशांवरून वाढून 800 रुपये किमतीवर पोहचले

या कालावधीत ‘सिम्फनी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 28 पैशांवरून वाढून 800 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ‘सिम्फनी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1218.95 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 821 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी ‘सिम्फनी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के घसरणीसह 844.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 30 कोटी

6 जून 2003 रोजी ‘सिम्फनी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 28 पैशांवर ट्रेड करत होते. या काळात ज्या लोकांनी सिम्फनी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 30 कोटींहून अधिक झाले आहे. 26 मे 2023 रोजी ‘सिम्फनी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 847.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

गुंतवणूकदारांना 302000 टक्के परतावा कमावून दिला

या कालावधीत ‘सिम्फनी लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 302000 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 6 जून 2003 रोजी सिम्फनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 30.25 कोटी रुपये झाले असते.

15 वर्षात दिला 22197 टक्के परतावा

मागील 15 वर्षात ‘सिम्फनी लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22197 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 11 जुलै 2008 रोजी सिम्फनी कंपनीचे शेअर्स 3.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या मल्टीबॅगर कंपनीचे शेअर्स आज 844 रुपये किमतीवर पोहचले आहेत. जर तुम्ही 11 जुलै 2008 रोजी सिम्फनी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.23 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Symphony Share Price today on 30 May 2023.