 
						Syrma SGS Share Price | सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. CLSA फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 24 टक्के वाढू शकतात. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकला ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. ( सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 645 रुपये किंमत स्पर्श करेल. ही किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 24 टक्के अधिक आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के वाढीसह 525.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2024 या वर्षात सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. मात्र मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 83 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. सिरमा एसजीएस ही कंपनी एक टेक्नॉलॉजी बेस्ड इंजिनियरिंग आणि डिझाइन कंपनी आहे. ही कंपनी टर्नकी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवेच्या व्यवसायात गुंतलेली आहे.
CLSA फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी ही कंपनी EMS क्षेत्रात अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी पुढील काळात, पॉवर सेक्टर, एरोस्पेस आणि हेल्थकेअर यांसारख्या नवीन विभागांमध्ये व्यवसाय विस्तार करू शकते. ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे की पुढील काही दशकांमध्ये या कंपनीच्या उद्योगाची वार्षिक वाढ 22 टक्के CAGR दराने होईल.
तज्ञांच्या मते, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी कंपनीच्या महसूल संकलनात 2023 ते 2026 दरम्यान वार्षिक 38 टक्के CAGR दराने वाढ होईल. मात्र ब्रोकरेज फर्मने कंपनीचे मार्जिन आणि रिटर्न रेशोवरही लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी कंपनीने 15.52 कोटीं रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 33.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2023 मध्ये सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी कंपनीने 6.7 कोटी रुपयेची निव्वळ विक्री साध्य केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		