
Tarsons Share Price | टार्सन प्रोडक्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची चढ-उतार पाहायला मिळत आहे. टार्सन प्रोडक्ट्स या वैद्यकीय उपकरणे आणि सप्लाय कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18 टक्के वाढीसह 573.95 रुपये ट्रेड करत होते.
18 जानेवारी 2023 रोजी टार्सन प्रोडक्ट्स कंपनीचे शेअर्स 721 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर ऑक्टोबर 2023 या महिन्यात टार्सन प्रोडक्ट्स स्टॉक 444.75 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचला होता. आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी टार्सन प्रोडक्ट्स स्टॉक 1.29 टक्के घसरणीसह 546.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
नुकताच टार्सन प्रोडक्ट्स कंपनीने दिलेल्या अपडेटनुसार, टार्सन प्रोडक्ट्स कंपनीच्या उपकंपनीने Nerbe R & D GmbH आणि Nerbe Plus जर्मनी या कंपन्यांचे अधिग्रहण करण्यासाठी एक शेअर खरेदी करार संपन्न केला आहे. टार्सन प्रोडक्ट्स कंपनीने 20 डिसेंबर 2023 रोजी स्टॉक फाइलिंगमध्ये सांगितले की, टार्सन प्रोडक्ट्स कंपनीने आपल्या पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या Tarsan Life Science चे अधिग्रहण करण्याचा ठराव मंजूर केला आहे. हे अधिग्रहण करण्यासाठी टार्सन प्रोडक्ट्स कंपनी सुमारे 10-15 दशलक्ष युरो खर्च करणार आहे. या शेअर खरेदी करारानंतर Tarsan Life Sciences कंपनी टार्सन प्रोडक्ट्स कंपनीच्या जर्मन कंपनीची होल्डिंग कंपनी बनेल आणि तिला होल्डिंग कंपनीला लागू होणारे सर्व अधिकार प्रदान केले जातील.
टार्सन प्रोडक्ट्स ही कंपनी मुख्यतः वैद्यकीय उपकरणे आणि पुरवठ्या संबंधित व्यवसाय गुंतलेली कंपनी आहे. ही कंपनी जीनोमिक्स, प्रोटी ओमिक्स आणि इम्यूनोलॉजीमध्ये वापरले जाणारे लॅब प्लास्टिक वेअरचे उत्पादन करण्याचे काम करते.
टार्सन प्रोडक्ट्स या कंपनीचा IPO 2021 साली लाँच करण्यात आला होता. त्यावेळी या कंपनीचे शेअर्स 662 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाले होते. इश्यू किमतीच्या तुलनेत टार्सन प्रोडक्ट्स स्टॉक फक्त सहा टक्क्यांच्या वाढीसह 700 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.