 
						Tata Group IPO | काही महिन्यांपूर्वी टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. आता टाटा समूह पुढील दोन ते तीन वर्षांत आणखी काही आयपीओ लाँच करण्याची योजना आखत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा समूह पुढील काही वर्षात टाटा कॅपिटल, टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी, बिगबास्केट, टाटा डिजिटल, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, टाटा हाउसिंग आणि टाटा बॅटरीज या कंपन्यांचे आयपीओ लॉन्च करण्याचा विचार करत आहे.
टाटा समूहाने डिजिटल, रिटेल, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये व्यवसाय विस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. टाटा सन्स होल्डिंग कंपनीच्या या धोरणात्मक निर्णयाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे, या सर्व कंपन्यांचे मूल्य अनलॉक करणे, आणि भविष्यातील व्यवसाय वाढीला चालना देणे तसेच काही निवडक गुंतवणूकदारांना कंपनीतून एक्झिट करण्याचा पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे.
टाटा समूहाने मागील वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO लाँच केला होता. यापूर्वी टाटा समूहाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचा IPO 2004 मध्ये लाँच केला होता. टाटा समूह 2027 पर्यंत आपल्या नवीन उद्योगांमध्ये 90 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करणार आहे. टाटा समूह मोबाइल पार्टस, इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, अक्षय ऊर्जा आणि ई-कॉमर्स या क्षेत्रात गुंतवणूक करून आपला व्यवसाय विस्तार करणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		