 
						Tata Group IPO | शेअर बाजारात पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आली आहे. टाटा ग्रुप अंतर्गत उद्योग करणारी टाटा प्ले कंपनी जी यापूर्वी टाटा स्काय म्हणून ओळखली जात होती, आपला IPO लवकरच बाजारात आणू शकते. टाटा प्ले कंपनीने 29 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉक मार्केट नियामक सेबीकडे गोपनीय प्री-फाइलिंग दस्तऐवज सादर केले आहे.
IPO साठी गोपनीय दस्तऐवज सादर :
सेबीने IPO आणणाऱ्या कंपन्यांसाठी हा नवीन पर्याय आणला आहे. या पूर्वी कंपन्या IPO साठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच DRHP सादर करत होते. हा पर्याय नवीन कंपन्यांसाठी देण्यात आला होता, जे प्राथमिक बाजारातून म्हणजेच IPO द्वारे भांडवल उभारणी करत असत. सेबीच्या नवीन सुविधेद्वारे कंपन्या आता आयपीओसाठी नोंदणी विवरण सादर करू शकतात, आणि ही संपूर्ण माहिती आता गुपित ठेवली जाणार आहे. याच नियमानुसार टाटा प्ले कंपनीने आपला IPO आणण्यासाठी कागदपत्र सादर केले आहेत.
जेव्हा कंपनीला IPO ची माहिती लोकांसाठी जारी करावीशी वाटेल, तेव्हा कंपनी अपडेटेड DRHP दाखल करू शकते. अपडेटेड DRHP दाखल केल्यानंतर आयपीओची संपूर्ण माहिती सर्वसामान्यांसाठी खुली केली जाईल. सेबीच्या या नवीन बदलामुळे कंपन्यांना माहितीच्या देवाणघेवाणीच्या बाबतीत लवचिकता प्राप्त होणार आहे.
IPO चा आकार :
टाटा समूहाचा हा टाटा प्ले डायरेक्ट- टू- होम प्लॅटफॉर्म खुल्या बाजारातून 2000 ते 2500 कोटी रुपये भांडवल उभारण्याची तयारी करत आहे. Tata Play ने या प्रस्तावित IPO साठी कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ अमेरिका, सिटी बँक, मॉर्गन स्टॅनले, आणि IIFL, या 5 बँकांना व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले आहे.
2004 च्या सुरुवातीला टाटा सन्स अँड नेटवर्क डिजिटल वितरण ही कंपनी टाटा स्कायमध्ये 80:20 या प्रमाणात मालक होती. टाटा नैटवर्कची डिजिटल वितरण सेवा रुपर्ट मर्डोकच्या ’21 सेंच्युरी फॉक्स’ या कंपनीच्या मालकीची होती, जी 2019 मध्ये वॉल्ट डिस्नेनी खरेदी केली होती. याव्यतिरिक्त वॉल्ट डिस्नेने ‘टीएस इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड’च्या माध्यमातून टाटा स्काय/टाटा प्ले कंपनीमध्ये 9.8 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. सध्या टाटा प्ले कंपनीमध्ये टाटा सन्सचे भाग भांडवल 41.49 टक्के आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		