 
						Tata Group Stock | ज्या लोकांनी आतापर्यंत टाटा ग्रुपच्या शेअर्सवर विश्वास दाखवला आहे, त्यांना टाटा ग्रूपमधील शेअर्स नी कधीही निराश केले नाही. दीर्घ कालावधीत टाटा समूहातील या शेअरने आपल्या शेअर धारकांना मालामाल बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, “टायटन”. 22 वर्षांपूर्वी जर तुम्ही टायटन कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले असते केली असती तर, सध्या तुम्हाला 1 लाख टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला असता.
2000 साली शेअरची किंमत :
टायटन कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, 27 ऑक्टोबर 2000 रोजी टायटन कंपनीचा स्टॉक NSE निर्देशांकावर 2.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या दिवाळीत 21 ऑक्टोबर 2022 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 2,670.65 रुपयांवर ट्रेड करत होते. म्हणजेच टायटन कंपनीचा स्टॉक 22 वर्षात 104196.88 टक्के वर गेला आहे. जर तुम्ही 22 वर्षांपूर्वी टायटनच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुम्हाला 10.44 कोटी रुपयांचा परतावा मिळाला असता.
गेल्या 5 वर्षांची कामगिरी :
गेल्या पाच वर्षात टायटन कंपनीचा स्टॉक 352.61 टक्के वर गेला आहे. टायटन कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 12.25 टक्के वर गेले आहेत. त्याच वेळी, टायटनच्या शेअर्सनी या वर्षी आपल्या शेअर धारकांना दर वार्षिक दराने 5.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या स्टॉकमध्ये 8.83 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा ज्वेलरी कंपनीचा स्टॉक 2.20 टक्के वाढला आहे.
कंपनीची व्यापार वाढ :
सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत टायटन कंपनीची एकूण विक्री वार्षिक 18 टक्के वाढली आहे. तसेच, कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आपल्या रिटेल नेटवर्कमध्ये 105 नवीन स्टोअर्स जोडले आहेत. कंपनी मुख्यतः दागिने, घड्याळे आणि वेअरेबल आणि आयकेअर सेगमेंटमध्ये कार्यरत आहे. टायटनने आपल्या तिमाही अहवालात म्हटले आहे की त्यांच्या बहुतेक सर्व वस्तूंच्या विक्रीत दोन अंकी वाढ झाली आहे. एकूण वार्षिक विक्री आधारावर 18 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. घड्याळे आणि वेअरेबल डिव्हिजनमध्ये वार्षिक विक्री 20 टक्के वाढली आहे. घड्याळ आणि वेअरेबल या सेगमेंटने सर्वाधिक तिमाही महसूल कमावून दिला आहे. कंपनीने नुकताच टायटन वर्ल्डची 7 नवीन स्टोअर्स, हेलिओसची 14 स्टोअर्स आणि फास्ट्रॅकची 2 नवीन स्टोअर्स सुरू केले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		