
Tata Group Stocks | टाटा समूहाचा भाग असलेली टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये बीएसई निर्देशांकावर 13.03 टक्के वाढ झाली असून प्रती शेअर किंमत 2,215 रुपये विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या शेअरच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. मोठ्या प्रमाणात खरेदी वाढल्यामुळे स्टॉक मध्ये वाढ झाली असल्याचा निष्कर्ष गुंतवणूकदारांनी काढला आहे.
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन शेअर्स :
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही टाटा समूहाची गुंतवणूक क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. मंगळवारी ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये बीएसई निर्देशांकावर 13.03 टक्केहून अधिक वाढ पाहायला मिळाली होती आणि शेअरची किंमत 2,215 रुपये विक्रमी पातळीवर पोहोचली होती. इंट्राडेमध्ये कंपनीच्या शेअर 2,253 रुपये ह्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळी किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही ट्रेडिंग सेशनपासून ह्या शेअर मध्ये सकारात्मक वाढ पाहायला मिळत आहे. यापूर्वीच्या पाच ट्रेडिंग सेशन मध्ये स्टॉक 23.32 टक्के वधारला आहे.
टाटा समूहाच्या अनेक उद्योगापैकी एक असलेली टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच TICL टाटा सन्स ग्रुपच्या मालकीची कंपनी आहे. TICL कंपनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोंदणीकृत केलेली नॉन-बँकिंग वित्तीय संस्था आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे जुने नाव “द इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया” असे होते, जे नंतर बदलून टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन असे करण्यात आले होते. ही वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी प्रामुख्याने इक्विटी शेअर्स आणि इक्विटी-संबंधित सिक्युरिटीजसारख्या दीर्घकालीन गुंतवणुकीत व्यवसाय करते. टाटा समूहाच भाग असलेल्या या कंपनीच्या शेअर मध्ये एका वर्षात 62 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे.
तिमाही कमावलेला एकूण नफा :
जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत म्हणजेच 2023 च्या पहिल्या तिमाही कालावधीत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने एकूण निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या तुलनेत 66.5 टक्के अधिक वाढ झाली आहे, आणि निव्वळ नफा 89.7 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कर कपातीनंतर कंपनीचा निव्वळ नफा 59.8 कोटी रुपये होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.